विडंबन काव्य

मूळ कवीची क्षमा मागून…..

‘शरद ‘आला तो धावुनी आला काळ
विव्हळला ‘ठाकर बाळ
हे ‘माई’गे दिर्घ फोडून हाक
तो रडला धरूनी शोक
हे ‘शिंदेंच्या’श्रवणी करुणा वाणी
ॠदयाचे झाले पाणी
त्या ठाकरे पुत्रा बघुनी…
शोकाकुल भावी नृमणी…..
आसवे आणून नयनी ….
तो वदला हा’स्वार्थ’ तुझ्या नाशाला
‘संजय’ ही कारण बाळा
मग कळवळूनी ‘नाथा’सी बोले बाळ
कशी साधली त्याने वेळ?
मम म्हातारे मायबाप गहिवरले
परलोकी जाउन बसले
राज्यपदी मी बसवीन ‘सैनिकाला’
शब्द त्यांना मी हो दिधला
पालन करण्या त्या शपथेचे…….
ऐक्य तोडले वर्षांचे……..
ध्येय साधले ‘वर्षाचे ‘……..
तीस महिन्यांचा काळ कसा हा सरला
पापाचा घडा हो भरला
त्या शरदाचे स्वप्न पूर्ण तर झाले
मम सेनेचे विघटन झाले
आभार देवेंद्र -नाथांचे………
धावले कसे एकदाचे……..
उलटवले फासे तयांचे………
मम जनतेला न्याय तयांनी दिधला
शरदाचा मुख भंग केला
अनाथ ही झाली माझी जनता
एकनाथची दिसू दे ममता
देवेंद्र तू तर भ्राता …
तूच एक हो त्राता…….
घेऊनी संग एकनाथा……..
मी गातो रे गातो तुमची गाथा
तव चरणी ठेऊन माथा

कवी अज्ञात….

समाजमाध्यमावरुन साभार…

Leave a Reply