अहमदनगर येथे शेतकऱ्यांनी अडवला अजित पवारांचा ताफा

अहमदनगर : १५ जुलै – राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा ताफा आज अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे अडवण्यात आला. जिल्ह्यातील शेतकरी नेते दशरथ सावंत यांच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांचा ताफा अडवला. दशरथ सावंत यांना पोलीसांनी अजित पवारांची भेट नाकारली. सकाळीच दशरथ सावंत यांना ताब्यात घेण्यात आलं. त्यामुळे संतापलेल्या शेतकरी विकास मंडळाचे कार्यकर्ते आणि भाजपा कार्यकर्त्यांनी अजित पवारांनी ताफा अडवला होता. यानंतर तातडीने पोलिसांना आंदोलकांना हटवले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.
2019 साली राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश करणाऱ्या मधुकर पिचड आणि सिताराम गायकर यांच्या विरोधात अजित पवार यांनी सभा घेत सिताराम गायकर यांचे धोतर फेडणार अशी वल्गना केली होती. मात्र आता अकोले सहकारी साखर कारखाना निवडणुकीत पिचडांपासून बाजूला होत पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या सिताराम गायकर यांच्या शेतकरी समृद्धी मंडळाच्या प्रचारासाठी अजित पवार आले आहेत.
या गोष्टीचा जाब सभेच्या स्टेजवर जाऊन विचारणार असल्याचं शेतकरी नेते दशरथ सावंत यांनी इशारा दिला होता. त्यामुळे सकाळीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. या विरोधात शेतकरी विकास मंडळाचे कार्यकर्ते आणि भाजपा कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि अजित पवार यांचा ताफा अडवला. पोलीसांनी आंदोलकांना हटवल्यानंतर अजित पवार सभास्थळी पोहचले.
अजित पवारांनी दिलेल शब्द पाळला नाही. म्हणून अजित पवार यांना सभेच्या व्यासपीठावर शांततेच्या मार्गाने जाऊन भेटणार आहे. जिल्हा बँक निवडणुकीच्या वेळी आमची भेट झाली होती. त्यावळी अजित पवारांनी मला मााघार घेण्याची विनंती केली होती. त्यावेळी मी माघार घेत त्यांना सीताराम गायकरांना तुम्ही आता पवित्र करुन घेताय पण अगस्ती कारखाना निवडणुकीवेळी तुमच्या पॅनलचे गायकर नेतृत्व तर नाहीच पण ते उमेदवार सुद्धा असता कामा नये, अशी अट त्यांना घातल्याचं सावंत यांनी सांगितलं. कारखाना निवडणुकीवेळी एकत्र बसून निर्णय घेऊ, असा शब्द अजितदादांनी दिला होता असं सावंत यांनी सांगितलं.

Leave a Reply