केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर फेकला बॉम्ब

नवी दिल्ली : १२ जुलै – केरळमधील कन्नूर जिल्ह्यामधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर बॉम्ब फेकण्यात आलाय. येथील पय्यानुरमध्ये असणाऱ्या संघाच्या कार्यालयावर अज्ञात व्यक्तींनी बॉम्ब फेकल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.
मंगळवारी म्हणजेच १२ जुलै २०२२ रोजी सकाळच्या सुमारास हा हल्ला करण्यात आल्याची माहिती पय्यानुर पोलिसांनी दिलीय. या हल्ल्यामध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मात्र या बॉम्बस्फोटामुळे इमारतीच्या काचा फुटल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. कार्यालयातील फर्निचरचंही नुकसान झाल्याचं कार्यालयामधील फोटोंमध्ये दिसत आहे.
या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे. सीसीटीव्ही आणि इतर पुराव्यांच्या आधारे प्राथमिक तपास हाती घेण्यात आला असून हे कृत्य कोणी केलं याचा शोध घेतला जात आहे.

Leave a Reply