नासाने जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने घेतलेले विश्वाचे पहिले रंगीत छायाचित्र प्रसिद्ध

नवी दिल्ली : १२ जुलै – अमेरिकन अंतराळ संस्था नासाने जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने घेतलेले विश्वाचे पहिले रंगीत छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी व्हाईट हाऊसमध्ये आयोजित एका कार्यक्रमात हे छायाचित्र प्रसिद्ध केले. यावेळी बोलताना ”विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी हा एक ऐतिहासिक दिवस” असल्याची प्रतिक्रिया बायडेन यांनी दिली. 13 अब्ज वर्षांपूर्वीच्या बिग बॅंगनंतर तयार झालेल्या विश्वाचे हे पहिले रंगीत छायाचित्र आहे.
या संदर्भात बोलताना नासाचे प्रशासक बिल नेल्सन म्हणाले, “आम्ही १३ अब्ज वर्षांहून अधिक मागे वळून पाहत आहोत. या लहान कणांपैकी एकावर तुम्हाला दिसणारा प्रकाश 13 अब्ज वर्षांपासून प्रवास करत आहे. यामुळे तो बिग बँगपेक्षा फक्त 800 दशलक्ष वर्षे लहान आहे. हे असे दृश्य आहे जे आम्ही यापूर्वी कधीही पाहिले नव्हते.”
यावेळी बोलताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी आजचा दिवस हा विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी हा एक ऐतिहासिक दिवस असल्याचे म्हटले. जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात शक्तिशाली दुर्बिणीने विश्वाच्या इतिहासात अंतराळाचे एक नवीन छायाचित्र दिले आहे. हा अमेरिका आणि संपूर्ण मानवजातीसाठी ऐतिहासिक क्षण असल्याचेही ते म्हणाले.

Leave a Reply