नागपूर ग्रामीणमध्ये वाघीण आणि तिच्या बछड्याचा मुक्त संचार

नागपूर : १० जुलै – नागपूर शहरापासून ३० किलोमीटर अंतरावर खातमारी पांजरी (लोधी) येथे गेल्या चार दिवसांपासून वाघीण आणि तिचा बछडा फिरत आहे. या परिसरात तिने निलगायीची शिकार केली असून गावाच्या परिसरातच ते फिरत असल्याने गावकरी घाबरले आहेत. सायंकाळनंतर घराबाहेर पडू नये, असे आवाहन वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.
नागपूरपासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावरील खातमारी पांजरी (लोधी) हे गाव आहे. या गाव परिसरात गेल्या चार-पाच दिवसांपासून एक वाघीण तिच्या बछड्यासह फिरत आहे. या परिसरात निलगाईची शिकार झाल्यानंतर वनविभागाने येथे कॅमेरा ट्रप लावले असून, या कॅमेऱ्यांमध्ये देखील ते दिसले आहेत.
तर, आम्हाला निर्देश देण्यापेक्षा वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करावा, अशी गावकऱ्यांची मागणी आहे. आम्ही घराबाहेर पडलो नाही तर शेतातील कामे कशी करणार?, आमचे नुकसान कोण भरुन देणार?, नुकतेच येऊ लागलेले पीक इतर प्राण्यांनी खाल्ले तर काय?, असे अनेक प्रश्न गावकऱ्यांना पडले आहेत.

Leave a Reply