एकनाथ शिंदे भाजपाची उरली सुरली लोकप्रियता लवकरच संपवतील – अमोल मिटकरी

अकोला : १० जुलै – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्लीमध्ये फडणवीस, शिंदे यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी खोचक ट्वीट केले आहे. ‘एकनाथ शिंदे भाजपाची उरली सुरली लोकप्रियता लवकरच संपवतील’, असा टोला मिटकरींनी भाजपाला लगावला आहे.
‘सद्यस्थिती महाराष्ट्रात मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यामुळे श्री देवेंद्र फडणवीस दुसऱ्या, चंद्रकांत पाटील तिसऱ्या तर इतर भाजप नेते चौथ्या व पुढच्या नंबर वर फेकले गेलेत . विश्वास आहे शिंदे साहेब भाजपची जनमानसातील उरली सुरली लोकप्रियता लवकरच संपवतील’, असे ट्वीट अमोल मिटकरी यांनी केलं आहे.

Leave a Reply