संततधार पावसामुळे गोसेखुर्द धरणाचे ९ दरवाजे उघडले

भंडारा : ८ जुलै – गोसीखुर्द धरणाच्या पानलोट क्षेत्रात सतत पाऊस पडत असल्याने गोसीखुर्द धरणाचे 33 पैकी 9 दरवाजे अर्ध्या मीटर ने उघडण्यात आले आहे. विशेष म्हणजे या वर्षीच्या मान्सून सेशनमध्ये पहिल्यांदा हे धरणाचे दरवाजे उघडे करण्यात आले आहे. तर या नऊ दरवाज्यातून 1125.25 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. यामुळे वैनगंगा नदी दुथळी भरून वाहत असून नदी काठीला गावाला सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
जून महिन्यामध्ये भंडारा जिल्ह्यात अपेक्षेनुसार पाऊस पडला नाही मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने दमदार सुरुवात केली आहे. मागील तीन दिवसांपासून भंडारा जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांमध्ये दमदार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 87 टक्के पाऊस पडलेला आहे. यामध्ये भंडारा तालुक्यात ७४%, मोहरी तालुक्यात 87%, तुमचे तालुक्यात 84%, पवनी तालुक्यात 89 टक्के, लाखांदूर तालुक्यात ७७ टक्के, लाखनी तालुक्यात 69 टक्के आणि सर्वाधिक पाऊस साकोली तालुक्यात 130 टक्के पडलेला आहे. त्यामुळे बरेच नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत तसेच शेतकऱ्यांनीही शेतीच्या कामाला मोठ्या प्रमाणात सुरुवात केलेली आहे.
गोसे धरणाची सर्वोच्च पातळी 245. 500 मीटर आहे. तर सध्या धरणाची पाणी पातळी 242.800 मीटर एवढी आहे आणि ही पातळी कायम ठेवण्यासाठी हे गेट उघण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी 3 गेट उघडण्यात आले मात्र धरणातील पाणी पातळी सतत वाढत असल्याने दुपारी 3 वाजेला धरणाचे 9 गेट हे अर्ध्या मीटर ने उघडण्यात आले आहे. या मधून सध्या 11245.25 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग होत असून यामुळे वैनगंगा नदी दुथडी वाहत त्यामुळे नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. जर धरणक्षेत्रात अजून पाऊस झाला किंवा धरणात वरच्या भागावरून येणाऱ्या पाण्याचा प्रमाण वाढल्यास गरजे नुसार अजून गेट उघडण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Leave a Reply