उमेश कोल्हेंना भाजपतर्फे सामूहिक श्रद्धांजली

अमरावती : ४ जुलै – उमेश कोल्हे हत्या प्रकरणी निषेध नोंदविण्यासाठी भाजपतर्फे सोमवारी राजकमल चौकात शोकसभेचे आयोजन करण्यात आले. या सभेत भाजपचे राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे, विधान परिषद सदस्य प्रवीण पोटे, डॉ. रणजीत पाटील यांच्यासह भाजपचे स्थानिक नेते सहभागी झाले. यावेळी उमेश कोल्हे यांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. शोकसभेला कोल्हे कुटुंबातील सदस्य देखील उपस्थित होते.
शोकसभेच्या प्रारंभी भजने सादर करण्यात आली. शोकसभेत भाजपचे शहराध्यक्ष किरण पातूरकर, भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकणी, भाजपचे महापालिकेतील माजी गटनेते तुषार भारतीय, माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते सहभागी झाले. शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य राखीव पोलीस दलाच्या तीन तुकड्यांसह शहरातील विविध भागात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

Leave a Reply