त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरु होतो – राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका

मुंबई : ३० जून – शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे बहुमत गमावलेल्या उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. सुप्रीम कोर्टाने बहुमत चाचणीसाठी स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर रात्री ९.३० वाजता फेसबुक लाईव्ह करत उद्धव ठाकरेंनी राजीनाम्याची घोषणा केली. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर राज्यासह देशभरातील नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही राजीनाम्याच्या निमित्ताने अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.
“एखादा माणूस आपल्या नशिबालाच स्वत:चं कर्तृत्व समजू लागतो, त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरु होतो,” अशी पोस्ट राज ठाकरेंनी शेअर केली आहे. राज ठाकरेंनी या पोस्टमध्ये उद्धव ठाकरेंचा उल्लेख टाळला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर बहुमत गमावलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शक्तिपरीक्षेला सामोरे जाण्यापूर्वी राजीनामा दिल्याने महाविकास आघाडी सरकार बुधवारी रात्री कोसळले. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यामुळे विधानसभेतील शक्तिपरीक्षा मात्र टळली. या घडामोडींनंतर भाजपाच्या वतीने सरकार स्थापण्यासाठी आजच दावा केला जाणार आहे.

Leave a Reply