फ्लोअर टेस्टमध्ये मतदान करण्यासाठी अनिल देशमुख, नवाब मलिकांची सर्वोच्च न्यायालयात धाव

मुंबई : २९ जून – महाराष्ट्रामध्ये राजकीय नाट्याला नवे वळण येत आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी आदेश दिले आहे. पण, आता महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यामध्ये अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यावर ईडीची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान ते अटकेत असल्याने राज्यसभा आणि विधानपरिषदेसाठी मतदानाचा अधिकार द्यावा यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
उद्या होणाऱ्या फ्लोअर टेस्टमध्ये मतदान करण्याची मागणी नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी केली आहे. दरम्यान या याचीकेवर आज संध्याकाळी 5.30 वाजता सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाने सहमती दर्शवली आहे.
यापूर्वी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी मतदानासाठी परवानगी मागून घेतली होती. परंतु त्यांना परवानगी देण्यात आली नव्हती. यामुळे पुढच्या काही तासात मलिक आणि देशमुखांना उद्या मतदानासाठी परवानगी मिळेल का हे समजणार आहे.

Leave a Reply