अमरावतीचे ४ अँथलिट एशियन अँथलॅटिक चॅम्पियनशिपसाठी रवाना

अमरावती : १३ एप्रिल – श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावतीद्वारा संचालित अँथलॅटिक क्लबचे ४ अँथलिट आशीयाई स्पर्धेत भाग घेण्यास नेपाळ येथे रवाना झाले आहे. नेपाळमध्ये पॅसिफिक एशियन अँथलॅटिक चॅम्पियनशिप १५ ते १८ एप्रिल दरम्यान होणार आहे.
राजस्थानमध्ये राष्ट्रीय पॅसिफिक स्पोर्ट स्पर्धा 26 ते 28 फेब्रुवारी या काळात झाल्या. यामध्ये 4 स्पर्धकांनी आप-आपल्या खेळ प्रकारामध्ये महाराष्ट्राकडून भाग घेतला. जागृती गजानन शिंगारे हिने ट्रिपल जम्पमध्ये 10.48 मीटर उडी घेऊन प्रथम स्थान प्राप्त केले. जागृती ही गेल्या चार वर्षापासून हनुमान व्यायाम प्रसारक मंडळामध्ये सराव करीत आहे. वर्षा हरी कानपुरे ही सुद्धा संस्थेत गेल्या तीन वर्षापासून सराव करीत आहे. वर्षाने ‘हतोडा फेक’ या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये हतोडा 46.02 मीटर फेकून प्रथम स्थान प्राप्त केले. तसेच प्रियंका सुनील पवार ही 2 वर्षापासून संस्थेमध्ये सराव करीत असून ती बी.पी.एड. प्रथम वर्षाची विद्यार्थीनी आहे. तिने 100 मीटरमध्ये प्रथम स्थान प्राप्त केले. ओम हिरपुरकर याने 18 वर्षा खालील स्पर्धेमध्ये भाग घेऊन प्रथम स्थान प्राप्त केले. ओम रामकृष्ण क्रीडा विद्यालयामध्ये 11 वीचा विद्यार्थी असून तो गेल्या दोन वर्षापासून सराव करीत आहे.
हे सर्व स्पर्धक संस्थेचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, अँथलॅटिक कोच डॉ. उत्तमचंद ठाकूर, प्रा. अतुल पाटील, प्रा. सुनील पिंपळे, प्राध्यापिका जया देषमुख, अनिता टी. कुर्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात. स्पर्धकांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेकरिता संस्थेचे प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य, कोषाध्यक्ष डॉ. सुरेश देशपांडे, कार्याध्यक्ष डॉ. रमेश गोडबोले, उपाध्यक्ष डॉ. श्रीकांत चेंडके, सचिव प्रा. डॉ. माधुरी चेंडके, अॅथलॅटिक कोच डॉ. उत्तमचंद ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply