फडणवीसांसोबत जाण्यापेक्षा मी राजीनामा देतो, तुम्ही मुख्यमंत्री व्हा – उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंना ऑफर

मुंबई : २१ जून – राज्यातील राजकीय भूकंपादरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यासमोर काही अटी ठेवल्या होत्या. मात्र आता उद्धव ठाकरेंनी यावर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. “एकनाथ शिंदे यांनी फडणवीस यांच्यासोबत जाऊन उपमुख्यमंत्री पद घेण्यापेक्षा मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतो. त्यांनी शिवसेनेत परत येऊन मुख्यमंत्री बनावं, अशी ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली आहे.”
मी शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळावे यासाठी ही भूमिका घेतली होती. वर्षा बंगल्यावर आपल्या खाजगी सहकार्यांसोबत केलेल्या चर्चेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली ही भूमिका बोलून दाखवली आहे.
एकनाथ शिंदे कोणत्याही पक्षासोबत जाणार नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जायचं नाही, अशी त्यांची मागणी आहे. त्याचबरोबर शिवसैनिकांवर अन्याय होता कामा नये, तसंच शिवसेना आमदारांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे या मागणीवर ते ठाम आहेत. शिंदे चर्चा करायला तयार आहेत. पण, सर्व आमदारांसोबत चर्चा केली जावी अशी त्यांची मागणी आहे.
गेली अडीच वर्षे मनात धगधगणाऱ्या ज्वालामुखीचा अखेर आज स्फोट झाला. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करताना शिवसेना पक्षप्रमख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी सिचवलं होतं. तसं अधिकृत पत्रही राज्यपालांना देण्यात आलं होतं. मात्र शिवसेना नेते संजय राऊत आणि सुभाष देसाई यांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाला विरोध केला होता. शिवसेना पक्षात आणखी एक नारायण राणे निर्माण होईल आणि मग तो पक्षाला डोईजड होईल. अशी कारणं देत उद्धव ठाकरे यांचे कान भरण्यात आले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री बनण्याचे रास्ता रोखला गेला. गेल्या अडीच वर्षात देखील पक्षातील प्रमुख निर्णय प्रक्रियेतून एकनाथ शिंदे यांना परस्पर दूर ठेवलं जात होतं. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे सर्वात बलाढ्य नेते आहेत. असं असूनही त्यांना मिळणारी सापत्नं वागणूक शिवसेनेच्या इतर आमदारांनाही खटकत होती.

Leave a Reply