विधानपरिषदेत यश मिळवल्यानंतर नागपूर भाजपचा जल्लोष

नागपूर : २१ जून – विधान परिषदेच्या पाचही जागांवर भारतीय जनता पक्षाने यश मिळविल्याने नागपूरमध्ये शहर भाजपतर्फे टिळक पुतळ्यासमोरील पक्षाच्या कार्यालयासमोर ढोल ताशांच्या निनादात आणि फटाक्याची आतषबाजी करत जल्लोष करण्यात आला.
सोमवारी विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे सर्व पाचही उमेदवार विजयी झाले. राज्यसभे पाठोपाठ विधान परिषदेच्या निवडणुकीतही पक्षाला घवघवीत यश मिळवून देण्यात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे मंगळवारी भाजप कार्यकर्त्यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी पेढे वाटले व जल्लोष केला.
महिलाना कार्यकर्त्यांनी फुगडी खेळत आनंद व्यक्त केला. यावेळी आमदार व शहर अध्यक्ष प्रवीण दटके, माजी महापौर दयाशंकर तिवारी, अनिल सोले, सुधाकर कोहळे, धर्मपाल मेश्राम, बंटी कुकडे, बंडू राऊत, प्रमोद पेंडके आदी उपस्थित होते.

Leave a Reply