मुंबई उच्च न्यायालयात माजी सैनिकाचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई : १७ जून – मुंबई उच्च न्यायालयात एका व्यक्तीने भर कोर्टात आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तुषार शिंदे असं या व्यक्तीचं नाव असून या 55 वर्षीय माजी सैनिकाने कोर्टातच आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या व्यक्तीच्या संपत्तीच्या वादाचं प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित असल्यानं त्याने हे पाऊल उचलल्याचं समोर येत आहे
संपत्तीच्या वादाचं प्रकरण प्रलंबित असल्याने या व्यक्तीने कोर्टातच स्वतःची नस कापण्याचा प्रयत्न केला. मात्र बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं वाईट प्रसंग टळला. यानंतर शिंदे यांना हायकोर्टातील पोलिसांनी ताब्यात घेतलं.
वृद्ध आई वडिलांविरोधात 55 वर्षीय तुषार शिंदे यांनी संपत्ती वादातून केस फाईल केली होती. ज्याचा निकाल आई वडिलांच्या बाजूने लागला. त्यामुळे संपत्ती हातातून गेली या निराशेत तुषार शिंदे यांनी हे पाऊल उचललं. त्यांनी कोर्टाच्या परिसरातच धारदार शस्त्राने हाताची नस कापण्याचा प्रयत्न केला. मात्र कर्तव्यावर असेलल्या पोलिसांनी वेळीच त्यांना ताब्यात घेतलं आणि गंभीर घटना टळली.
तुषार शिंदे घाटकोपर येथे नातेवाईकांकडे राहतात. सध्या ते पोलिसांच्या ताब्यात असून नातेवाईकांना बोलावण्यात आलेलं आहे. नातेवाईक तिथे पोहोचताच त्यांना नातेवाईकांकडे सोपवलं जाईल. दरम्यान या धक्कादायक घटनेनंतर कोर्टात एकच खळबळ उडाली. सुदैवाने पोलिसांच्या सतर्कतेमुळे कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही.

Leave a Reply