एटीएम मधून ५०० काढायला गेले मिळाले २५००!, नागपुरात एटीएम समोर जनतेची रांग

नागपूर : १५ जून – एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेल्यावर दुप्पट किंवा तिप्पट पैसे मिळाल्याचं तुम्ही ऐकलं आहे का? आश्चर्य वाटतंय ना? पण असा प्रकार नागपुरातून समोर आला आहे. तिथे एटीएममधून 500 रुपये काढण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला दुप्पट, तिप्पट नाही तर चक्क पाचपट पैसे मिळत असल्याचं समोर आलं आहे. एटीएममधून 500 रुपये विड्रॉ केल्यावर 2500 रुपये निघत असल्याचा व्हिडीओ सुद्धा शूट करण्यात आला असून तो व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.
नागपुरातील खापरखेडा येथील हा प्रकार असल्याची माहिती समोर आली आहे. येथील शिवा कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या अॅक्सिस बॅकेच्या एटीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Leave a Reply