तर देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मत देतील – संजय राऊत

मुंबई : १२ जून – राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेवर पराभव झाल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. “४८ तासांसाठी ईडी आमच्या हातात दिली तर देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मत देतील” असा टोला राऊत यांनी लगावला आहे. तसेच पंकजा मुंडेंना एकटे पाडण्याचा भाजपाचा डाव आहे. मुंडे कुटुंबाच आणि शिवसेनेचं जिव्हाळ्याचे नातं आहे. आणि आम्हाला पंकजा मुंडेंची काळजी असल्याचेही राऊत म्हणाले.
राष्ट्रपती निवडणुकीवर चर्चा करण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी १५ जून रोजी कॉन्स्टिट्यूशन क्लब दिल्ली येथे संयुक्त बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी विरोधी मुख्यमंत्री आणि नेत्यांना ममता यांनी पत्र लिहले आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह २२ नेत्यांना पत्र लिहिले आहे. मात्र, उद्धव ठाकरे त्यावेळी अयोध्या दौऱ्यावर असल्यामुळे या बैठकीला शिवसनेचा एक प्रतिनिधी हजर राहील, असे राऊत म्हणाले.

Leave a Reply