राज्य सरकारने ७० टक्के मागण्या मान्य केल्याने पुणतांबा येथील शेतकरी आंदोलन स्थगित

पुणतांबा : ९ जून – मागच्या काही दिवसांपासून पुणतांबा गावात शेतकऱ्यांचे विविध मागण्यासाठी आंदोलन सुरू होते.दरम्यान मागच्या दोन दिवसांपूर्वी ठाकरे सरकारने शेतकऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा केल्याने आंदोलन दोन दिवस स्थगित करण्याचे ठरवले होते. यानंतर पुणतांबा येथे आज ग्रामसभा घेण्यात आली या ग्रामसभेत आंदोलन सुरु ठेवायचं की स्थगित करायचं? याबाबतचा निर्णय घेण्यात येणार होता परंतु सरकारने 70 टक्के मागण्या मान्य केल्याने हे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी घेतला आहे.
पुणतांबा गावातील शेतकरी आंदोलन स्थगित झाले आहे. यामध्ये किसान क्रांतीकडून आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा करण्यात आली. पुणतांबा गावात झालेल्या विशेष ग्रामसभेत एकमताने निर्णय हा निर्णय घेण्यात आला. तीन महिन्यात दिलेली आश्वासने पुर्ण केली नाही तर पुन्हा आंदोलन करण्याचाही इशारा शेतकऱ्यांकडून देण्यात आला आहे. निवडणुकांचा तोंडावर हे आंदोलन झाले असते तर राज्य सरकारला मोठा फटका बसण्याची शक्यता होती परंतु आंदोलन स्थगित झाल्याने सरकारला दिलासा मिळाला आहे.
यावेळी किसान क्रांतीकडून सांगण्यात आले कि, केवळ सरकारला विरोध करायचा म्हणून हे आंदोलन नव्हतं. आम्ही शेतकरी प्रश्नावर सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी एकत्र आलो होतो. संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी पुणतांबा व्यासपीठ असल्याने शेतकरी प्रश्नांसाठी कायम लढा सुरू ठेवणार असल्याचे किसान क्रांती संघटनेकडून सांगण्यात आले

Leave a Reply