अखेर अमरावती अकोलादरम्यान ७५ किमीच्या रस्त्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

नागपूर : ९ जून – राष्ट्रीय महामार्ग ५६ वरील अमरावती ते अकोलादरम्यान १०७ तासांत ७५ किलोमीटर ‘बिटुमिनस काँक्रिट’रस्ते बांधणीच्या कामाची ‘गिनेस बुक ऑफ वल्र्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद करण्यात आल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरद्वारे दिली.
या विश्वविक्रमाबद्दल गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी, तंत्रज्ञ आणि कामगारांचे अभिनंदन केले. ३ जूनला सकाळी सात वाजता रस्ते बांधणीला सुरुवात झाली आणि ७ जूनला सायंकाळी ५ वाजता हे काम पूर्ण झाले. रस्त्यासाठी ३६ हजार ६३४ बिटुमिनस वापरण्यात आले, ७२० हून अधिक कामगारांनी रात्रंदिवस काम केले. या कामाची ‘गिनेस बुक ऑफ वल्र्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली, असे गडकरी यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवात ही कामगिरी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने पार पाडली याबाबत आनंदही व्यक्त केला.

Leave a Reply