अंदाज अपना अपना.. – डॉ. विजय पांढरीपांडे

हा खेळ आकड्यांचा..

5 may vijay pandhripande

जागतिक आरोग्य संघटनेने ११मार्च २०१९रोजी कोविद् १९ची घोषणा केली .दोन वर्षानंतर एकूण प्रभावित केसेस ची संख्या ४५२०लाख झाल्याचे म्हंटले आहे.नव्या केसेस सरासरी दिवसाला १०लाख झाल्याचे अंदाज वर्तविले आहेत.या एकूण काळात कोविद ने किती मृत्यू झालेत?याचे उत्तर वाटते तितके सोपे नाही.यापूर्वी १९५७-५८ च्या महामारीत १००, ०००लोकसंख्येच्या मागे मृत्यूचे प्रमाण १३८होते.तेच १९६८-६९ च्या साथीतएकूणलोकसंख्येच्या १००,०००मागे १११होते..आज जगाची लोकसंख्या ७.९बिलियन (७९०करोड)आहे.त्या अंदाजाप्रमाणे मृत्यू चे प्रमाण एकूण ८८ते १००लाख एव्हढे होते!११मार्च २०२२ला आरोग्य संघटनेने जगातील कोविद मृत्यू एकूण ६०लाख असल्याचे म्हंटले आहे.संख्या शास्त्र,आरोग्य शास्त्र जाणणारा कुणीही हे आकडे फसवे असल्याचे सांगेल.
यासाठी वेगळा डेटा हवा.या कोविदकाळात प्रत्येक देशात एकूण मृत्यू किती झाले,अन् एरवी नॉर्मल काळात सरासरी किती मृत्यू व्हायचे ही माहिती गरजेची आहे.जे देश मृत्यूची अचूक नोंद दरवर्षी ठेवतात तिथेच योग्य अंदाज बांधणे, निर्णयावर पोहोचणे शक्य आहे.जागतिक आरोग्य संघटने कडे एकूण १३३देशांचा डेटा आहे.सर्वच देशात सर्व मृत्यूची अचूक नोंद ठेवली जाते असे नाही.जपान मध्ये १००टक्के,युरोपियन युनियन मध्ये ९८टक्के,चीन देशात ८०टक्के, तर आफ्रिकेत केवळ १०टक्के मृत्यूची नोंद असते!त्यामुळे एरवी दरवर्षी किती मृत्यू व्हायचे,अन् करोणा काळात एकूण मृत्यू किती,त्यापैकी कोविद ने किती ही अचूक नोंद केवळ अशक्य वाटते. अगदी जपान सारख्या देशात सुध्दा,जिथे १००टक्के मृत्यू नोंद केली जाते,तिथेही किती मृत्यू इतर आजारा मुळे(हृदयविकार,डायबिटीस,किडनी समस्या,बाळंतपण,कुपोषण, क्यांसर ई.) झालेत हे अचूक सांगणे केवळ अशक्य आहे.आपल्या सरकारी यंत्रणा तेव्हढ्या सजग नाहीत.शिवाय सरकारी धोरणात लपाछपी असतेच. काही आकडे मुद्दाम जाहीर केले जात नाहीत.दंगलीत किती माणसे नेमकी दगावली याचे आकडे एकाच दिवशी विविध माध्यमात वेगवेगळी सांगितली जातात.सरकारचे ऑफिशियल आकडे वेगळेच असतात.
२०२०शेवटी कोविद मुळे १९.१लाख मृत्यू झाल्याचे समजते.जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार हा आकडा ३०लाख पर्यंत जातो!सियटल येथील इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्यालूएशन IHME नुसार ११मार्च २०२२पर्यंत excess global mortality १५३.४lakh असल्याचा अंदाज व्यक्त केलाय!
इकॉनॉमिस्ट या संस्थेच्या अंदाजा प्रमाणे हारेट,आकडा १४०लाख, अन् २३७लाख होतो!तर लेन्सेट या मेडिकल जर्नल नुसार excess mortality rate २०२०,२१साठी १८२लाख वर्तविण्यात आला आहे. एकूण काय कशाचाच कशाला मेळ नाही!
अगदी १५०लाख हा आकडा जरी गृहीत धरला तरी कोविद १९चे संकट आधीच्या महामारी पेक्षा किती तरी पटीने गंभीर होते हे लक्षात येते.कुठलेही संख्या शास्त्र,अल्गोरीथम वापरले तरी खरी आकडेवारी कधीच बाहेर येणार नाही.कारण आऊटपुट हा इनपुट वर अवलंबून असतो.आत येणारी माहितीच जर खरी नसेल तर कुठलेही शास्त्र कुचकामीचठरणार. आपण फक्त अंदाज अपना अपना असे म्हणत स्वस्थ बसायचे!

(संदर्भ IEEE जर्नल मधील माहिती वर आधारित)

डॉ. विजय पांढरीपांडे

Leave a Reply