दोन तरुणांनी केला युवकावर अनैसर्गिक अत्याचार

नागपूर : ३० मे – नंदनवन परिसरात दोन तरुणांनी एका १९ वर्षीय युवकावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अनिल उईके (वय २0) रा. बहादुरा फाटा आणि आवेश मिर्झा (वय २३) रा. दिघोरी अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर १९ वर्षीय युवकावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तीन दिवसांपूर्वी आरोपी आवेश याची या पीडित युवकाशी समलिंगी पुरुषांसाठीचे डेटिंग अँप असलेल्या ‘ब्युईड’ या अँपवर भेट झाली. यातून आवशने पीडिताला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यातून शुक्रवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास नंदनवन परिसरातील रमना मारोती परिसरात १९ वर्षीय युवकास भेटण्यासाठी बोलाविले. पीडित तरुण यावेळी भेटायला आला असताना आवेशसोबत त्याचा मित्र, अनिल उइकेही होता. यावेळी ते परिसरातील सूतगिरणीजवळ आले. यावेळी आवेश त्याला झुडुपात घेऊन गेला. तिथे गेल्यावर आवेशने त्याला पकडले आणि जमिनीवर पाडले. यानंतर अनिलनेही त्याच्यावर अत्याचार केले. आवेश आणि अनिल या दोन्ही आरोपींनी पाठोपाठ पीडितावर अनैसगिक अत्याचार केला. यानंतर दोघांनीही पळ काढला. यावेळी तरुणाने नंदनवन पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. तक्रार नोंदविताच पोलिसांनी चौकशी दोघांवर गुन्हा दाखल करीत तपासास सुरुवात केली. त्यात पोलिसांनी अनिलला अटक केली असून, आवेश अद्याप फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Leave a Reply