आता अजमेर शरीफ दर्ग्याचे सर्वेक्षण करण्याची मागणी

अजमेर : २७ मे – वाराणसीतील ज्ञानवापी, मथुरेतील इदगाह मशिदीनंतर आता राजस्थानातील अजमेर दर्ग्याबाबतही मोठा दावा करण्यात आला आहे. मंदिर उद्ध्वस्त करुन तिथे अजमेर चिश्ती दर्गा बांधण्यात आला असल्याचा दावा हिंदूवादी संगठन महाराणा प्रताप सेनेने केला आहे. हजरत मोईनुद्दीन चिश्ती दर्ग्याचे भारतीय पुरातत्व विभागाने सर्वेक्षण करण्याची मागणी केली आहे. महाराण प्रताप सेनेचे राजवर्धन सिंह परमार यांच्या म्हणण्यानुसार, दर्ग्यातील भिंती आणि खिडकींवर हिंदू धर्माशी संबंधित चिन्ह आहेत. आता यावरुन नवीन वाद सुरू झाला आहे.
राजवर्धन सिंह परमार यांनी दर्ग्याचा सर्व्हे करण्याचा मागणी भारतीय पुरातत्व विभागाकडे केली आहे. ख्वाजा गरीब नवाज दर्गा याआधी एक प्राचीन मंदिर होतं. त्यांच्या भिंतीवर आणि खिडकीवर स्वस्तिक चिन्ह आहेत, असं राजवर्धन यांनी म्हटलं आहे.
महाराणा प्रताप सेनेने केलेल्या दाव्यात काहीही तथ्य नाहीये, दर्ग्यात कोणत्याही प्रकारचे चिन्ह नाहीयेत. हिंदू- मुस्लीम दोन्ही समाजाचे लोक दर्ग्यात येतात. हा दर्गा ८५० वर्षांपूर्वीचा आहे, असं खादिम समितीचे अंजुमन सैयद जादगानचे अध्यक्ष मोईन चिश्ती यांनी म्हटलं आहे. तसंच, असे खोटे दावे करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, असंही अंजुमन सचिव वाहिद हुसैन अंगारा यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply