भेटायला बोलावून अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार

नागपूर : २३ मे – शहरातील बेलतरोडी पोलिस ठाणे हद्दीत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची गंभीर घटना पुढे आली आहे. २0 वर्षीय आरोपी आणि १५ वर्षीय मुलीची केवळ दोन दिवसाची ओळख होती. अशातच भेटायला बोलावून आरोपी तरुणाने हे कृत्य केले. सदर प्रकार उजेडात आल्यानंतर या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शुभम असे आरोपी मुलाचे नाव आहे. या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, बेलरोडी पोलिस ठाणे हद्दीत आरोपी शुभम तो कामावरही आहे. दरम्यान, तरुण पिढीच्या हातात मोबाईल नसणे सहसा शक्य नाही. अर्थात शुभमकडे देखील मोबाईल असल्यामुळे त्याचे फेसबुक अकाऊं ट आहे. मागील दोन दिवसांपूर्वी त्याची फेसबुकवरून पीडितेशी ओळख झाली. ही ओळख एवढय़ा झपाटाने पुढे गेली की, लगेच त्यांच्यात मोबाईलवरून बोलचालही सुरू झाली. लगेचच त्यांच्यात भेटी देखील व्हायला लागल्या. हे सगळं एवढे सुपरफास्ट सुरू होते की, ही गाडी कुठे आणि कुणावर धडकेल याचे भानही कुणाला उरले नाही. बोलचाल, भेटीगाठी सुरू असतानाच आरोपी शुभमने पीडितेला १८ मे रोजी भेटायला बोलावले. दुपारी ४.३0 वाजता भेटीची वेळ ठरली. त्यानंतर शुभम पीडितेला बेलतरोडी हद्दीतील बारई ले-आऊटजवळ, डीपी रोड येथे फिरायला घेऊन गेला. या परिसरात अवती-भवती जंगलाचा भाग आहे. अर्थात घनदाट वृक्षांनी वेढलेला हा परिसर आहे. येथे शुभमने पीडितेला आणल्यानंतर तिच्यावर तो चांन्स मारू लागला आणि येथेच त्याने पीडितेशी जबरी शारीरिक सबंध प्रस्थापित केले. त्यानंतर दोघेही आपापल्या मार्गाने परतले. पीडित मुलगी घरी आली. त्यानंतर आई तिच्यावर रागावली आणि घडलेला सर्व प्रकार हा पुढे आला. त्यानंतर तिच्या कुंटुंबीयांनी थेट बेलतरोडी पोलिस ठाणे गाठले आणि शुभम विरोधात तक्रार दाखल केली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply