राजनाथ सिंह यांची नागपूरला धावती भेट

नागपूर : २२ मे – केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज नागपुरात धावती भेट दिली. त्यांचा दौरा खासगी असल्याचे बोलले जात असले, तरी त्यांनी नागपूर विमानतळावर वायुसेनेतील अधिकाऱ्यांशी काही काळ चर्चा केल्याचे वृत्त आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा नातू निनाद याच्या मुंडनच्या घरगुती कार्यक्रमासाठी राजनाथ सिंह यांचे आज नागपुरात आगमन झाले. विमानतळावरून ते सरळ गडकरी यांच्या निवासस्थानी गेले, व निनाद याला आशीर्वाद देऊन काही वेळातच त्यांनी पार्टीची वाट धरली. यावेळी त्यांनी पत्रकार व कार्यकर्त्यांच्या भेटी टाळल्या, व पत्रकारांशी चर्चा न करताच ते निघून गेले. परत जाताना विमानतळावर वायुसेनेच्या काही अधिकाऱ्यांशी त्यांनी काही वेळ चर्चा केल्याचे वृत्त आहे.

Leave a Reply