अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या वायुदलात कर्मचाऱ्याला अटक

नागपूर : ११ मे – नागपूर शहरातील गिट्टीखदान पोलिसांनी वायुदलातील एका कर्मचाऱ्याला पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आदित्यधनराज नरेश शाहू (28) असे या आरोपीचे नाव असून, अवघ्या दोन दिवसांनी त्याच्या लग्नाचा मुहूर्त होता. मात्र त्याआधीच त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
आरोपी आदित्यधनराज शाहू हा वायुसेनेत कॉर्पोरल या पदावर कार्यरत असून, तो दुसऱ्या राज्यात तैनात आहे. 12 मे रोजी त्याचे लग्न नियोजित असल्याने तो लग्नासाठी रजेवर घरी आलेला होता. आदित्यधनराजच्या घरी लग्नाची लगबग सुरू असताना त्याने त्याच्या परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून बळजबरीने बलात्कार केला. याबाबत कुठेही वाच्यता केल्यास जीवानिशी ठार मारण्याची धमकी त्याने पीडित मुलीला दिली होती. मात्र आई वडील घरी परत आल्यानंतर तिने सर्व आपबीती त्यांना सांगितली. त्यानंतर पीडित मुलीच्या आई वडिलांनी थेट गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्याआधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
आरोपी आदित्यधनराज शाहू याची पत्नी दुसऱ्या राज्यात राहणारी होती. मात्र लग्न सोहळा हा नागपूर होणार असल्याने वधू आणि त्यांचे कुटुंबीय नागपूरला येण्यासाठी रवाना झाले होते. मात्र, नागपूरला येताच त्यांना आदित्यधनराजने केलेल्या कृत्याची माहिती समजली. त्यामुळे त्यांना मानसिक धक्काचं बसला आहे.

Leave a Reply