कारागृहाच्या मागे असलेल्या झाडाला गळफास लावून पोलिस कर्मचाऱ्याने केली आत्महत्या

अमरावती : ११ मे – अमरावती पोलीस आयुक्तालयातील पोलीस कर्मचारी विजय अडोकार यांनी अमरावती मध्यवर्ती कारागृहाच्या मागच्या बाजूला असलेल्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडलीये. विजय अडोकार हे वलगाव पोलीस स्टेशन येथे कार्यरत होते.
बुधवारी सकाळी अडोकार हे घराबाहेर पडले आणि त्यानंतर थोड्याच वेळात आडोकार यांचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसला. अडोकर यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. पोलीस कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणात आत्महत्याग्रस्त पोलिसांच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की पोलीस आयुक्त आणि ठाणेदार यांनी त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, निलंबनाची धमकी दिली, त्यामुळे त्यांनी हे कृत्य केले आहे. ठाणेदार यांच्यावर कारवाई केल्याशिवाय प्रेतावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. तशी तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Leave a Reply