क्षुल्लक कारणावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी, एका तरुणाचा जागीच मृत्यू

यवतमाळ : ९ मे – यवतमाळ शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरातील पाटी पुरा परिसरात क्षुल्लक कारणाहून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर दोन जण जखमी आहेत. वैभव कृष्णराव नाईक, असे मृत तरुणाचे नाव आहे. तर जखमी तरुणांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना रात्री उशिरा घडली. या घटनेने शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. तर याप्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
30 एप्रिलला वैभव नाईक, नयन सौदागर, सुहास खैरकर हे पाटी पुरा परिसरात एका ठिकाणी बसले होते. यावेळी या तिघांचा आरोपीशी वाद झाला होता. त्यानंतर प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी या तिघांनाही जय भीम चौक येथे बोलवण्यात आले. त्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या आरोपींनी धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केल. यात वैभव जागीच ठार झाला. तर नयन आणि सुहास पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्यावरही धारदार चाकूने हल्ला करण्यात आला. यात ते जखमी झाले.
या घटनेत तक्रारीवरुन शुभम वासनिक, रत्नदीप पटाले, करण तिहले, अर्जुन तिहले, रोशन नाईक, प्रथम रोकडे, अभि कासारे व इतर आशा 9 जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी तरुणांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना रात्री उशिरा घडली. या घटनेने शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. तर याप्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply