भंडारा कारागृहात कैद्यांनी केली मारहाण

भंडारा : ८ मे – भंडारा येथील कारागृहात सकाळचे आहार वाटप करणाऱ्या बॅरेक जबाबदाराला चार कैद्यांनी मारहाण केल्याची घटना ६ मे रोजी सकाळच्या सुमारास घडली.
महेश सुभाष आगाशे, मोहम्मद अफरोज उर्फ सोहेल युसुफ शेख, राहूल गोपीचंद पडोळे, शेख रफिक शेख रहेमान अशी कैद्यांची नावे आहेत. भंडारा येथील कारागृहात बॅरेब जबाबदार म्हणून देवेंद्र सुखदेव राऊत (३५) हे सकाळचा आहार कैद्यांना वाटप करित होते. तेव्हा कैद्यांपैकी शेख रफिक शेख रहेमान याने इतर कैद्यांच्या प्रमाणापेक्षा जास्त भाजी मागत होता. त्याला देवेंद्र राऊत यांनी जास्त भाजी देण्यास मनाई केली. त्यामुळे दोघांमध्ये भांडण झाले. एकमेकांना लाथाबुक्यांनी मारु लागले. तेव्हा कैद्याचे सहकारी महेश सुभाष आगाशे, मोहम्मद अफरोज उर्फ सोहेल युसुफ शेख, राहुल गोपीचंद पडोळे हे बॅरेकमधून धावून आले व देवेंद्र राऊत यांना मारहाण करु लागले. महेश आगाशे याने जमिनीवरील दगड उचलून देवेंद्र राऊत यांच्या डोळ्यावर मारला. त्यामुळे त्यांना दुखापत झाली. याप्रकरणी देवेंद्र राऊत यांच्या तक्र ारीवरुन भंडारा पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Leave a Reply