नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत २० मे पर्यंत वाढ

मुंबई : ६ मे – अल्पसंख्यांक मंत्री तथा मनी लाँड्रींग प्रकरणात कारागृहात असलेले राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ करण्यात आली आहे. आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने त्यांना 20 मेपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मंत्री नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना मनी लाँड्रींग प्रकरणात ईडीने अटक केली आहे. याप्रकरणी ईडीने त्यांच्याविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. ईडीने नवाब मलिकांच्या विरोधात 5 हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.

Leave a Reply