यावर्षी भारतात १० दिवस आधीच दाखल होणार मान्सून

मुंबई : ६ मे – सध्या देशात उन्हाचा तडाखा बसत आहे. उन्हामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. अशा आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे यावर्षी आता मान्सून हा भारतात 10 दिवस आधीच दाखल होणार आहे. ‘युरोपियन सेंटर फॉर मीडियम-रेंज वेदर’ या संस्थेने हा अंदाज वर्तवला आहे. 20 किंवा 21 मे रोजी मान्सून केरळच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. त्यानंतर तो पुढील काही दिवसात देशाच्या उर्वरित भागात बरसणार आहे, असा अंदाजही या संस्थेने वर्तवला आहे.
मार्च महिन्यापासून राज्यातील तापमानाने उच्चांक गाठला आणि यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. उष्णतेचा हा वाढता पारा अद्यापही कायम असल्याचं दिसून येत आहे. कधी कडाक्याचं उन तर कधी अवकाळी पाऊस या विचित्र परिस्थितीमुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. हवामान खातं आणि खासगी हवामान संस्था स्कायमेटचं म्हणणं आहे की, गुजरात वगळता या राज्यांमध्ये या यंदा मान्सूनचा (Monsoon) पाऊस सामान्य किंवा चांगला असू शकतो. तसंच ज्या भागांत मान्सूनपूर्व पावसाचं वातावरण कमी असतं तिथे चांगला पाऊस पडतो, याचा कोणताही शास्त्रीय आधार नाही. पण, यावेळी ते होणार असून हा निव्वळ योगायोग असेल.
तर ‘युरोपियन सेंटर फॉर मीडियम-रेंज वेदर’ या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार देशातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मान्सून दरवर्षीपेक्षा लवकर दाखल होणार आहे. उन्हाचा चटका वाढल्याने अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई भासत आहे. तसेच पिकांनाही पाण्याची गरज आहे, त्यामुळे अशा काळातच पाऊस पडणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

Leave a Reply