फर्निचर वर्कशॉपमध्ये लागलेल्या आगीत वृद्धाचा होरपळून मृत्यू

नागपूर : २५ एप्रिल – काटोलमध्ये फर्निचरच्या वर्कशॉपमध्ये लागलेल्या आगीत एका वृद्ध व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भीषण आगीत ८८ वर्षीय नुर महम्मद बोधर असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे.
काटोलमधील संचेती लेआऊटमध्ये पहाटे 3 वाजताच्या सुमारास सलीम फर्नीचर मध्ये इलैक्ट्रिक शॉक सर्किटमुळे आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र वर्कशॉपमध्ये तयार फर्निचर तसेच लाकूड असल्याने 2 तास आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले होते.
सुमारे तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे,मात्र या आगीत वर्कशॉपची मालकी असलेल्या बोधर कुटुंबातील वृद्ध नूर मोहम्मद यांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

Leave a Reply