राजस्थानमध्ये पीकअपच्या भीषण अपघातात ९ जणांचा मृत्यू

जयपूर : २० एप्रिल – राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील गुढागौडजी भागात पिकअपचा भीषण अपघात झाला. या घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला आहे. बीडीके रुग्णालयात जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या घटनेत मृत्यू झालेल्यांचे मृतदेर मोर्चरी येथे ठेवण्यात आले आहेत. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी रुग्णालयात दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्विट करत या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. या अपघातामुळं दु: ख झाल्याचं ते म्हणाले आबहेत. अशोक गेहलोत यांनी अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. तर, जखमींनी लवकर बरं व्हावं यासाठी प्रार्थना केली आहे.
राज्य मार्ग ३७ वरील लीलों ढाणी जवळ अपघात झाला. भरधाव वेगात असणारी पिकअप पलटल्यानं हा अपघात झाला. या पिकअपमधून प्रवास करणाऱ्या ८ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, एका जखमीचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला आहे. ९ जखमींवर उपचार करण्यात येत आहेत. खेतडी येथील बडाऊमधील एक कुटुंब लोहार्गल धाम येथून दर्शन घेऊन माघारी येत होते.मात्र, पिकअपचा वेग अधिक असल्यानं गाडी पलटी झाली आणि अपघातात ९ जणांना जीव गमवावा लागला आहे.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी या अपघातानंतर एक ट्विट केलं आहे. झंझुनू येथील गुढागौडजी येथे झालेल्या भीषण अपघातात ८ जणांना जीव गमवावा लागला, ही अत्यंत दु:खद घटना आहे. अपघातात ज्यांनी जीव गमावला त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करत असल्याचं गेहलोत म्हणाले. परेश्वरानं कुटुंबीयांना हा धक्का सहन करण्याचं बळ द्यावं, अशी प्रार्थना करत असल्याचं ट्विट गेहलोत यांनी केलं आहे.

Leave a Reply