एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन भरकटले : गोपीचंद पडळकर

सांगली : ९ एप्रिल : एसटी महामंडळ विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या 5 महिन्यांपासून आंदोलनावर ठाम असलेले एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन हिंसळ वळणानंतर संपले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला केल्यामुळे आंदोलक कर्मचाऱ्यांबद्दल सर्वच स्तरातून नाराजी व्यक्त केली जात आहे. तर, एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन भरकटलं आहे, अशी टीकाच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज आरेवाडी येथील बिरोबा बनात दर्शनासाठी येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पडळकर यांनी मंदिर परिसराची पाहणी केली यावेळी माध्यमांशी बोलत असताना एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर भाष्य केलं.
‘गेल्या 5 महिन्यापासून सुरू असलेल्या एस टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात आम्हीही 16 दिवस सहभागी होतो, तेव्हाच्या चर्चेत जे मान्य झाले त्यापेक्षा वेगळे काही इतके दिवस आंदोलन करून झाले नाही. आम्ही सांगितले होते यापेक्षा जास्त काही मिळणार नाही पण एस टी कर्मचारी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम होते’ असा खुलासाच पडळकर यांनी केला.
तसंच, मागण्या किती मिळणार हे सांगितले होते म्हणून त्यांनी पुढे आंदोलन सुरू ठेवले आणि शेवटी ते आंदोलन आता भरकटले आहे, अशी टीकाच पडळकर यांनी केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला झाला तो पोलिसांच्या तपासाचा भाग आहे. तो पूर्ण झाल्यावर त्यातून वस्तुस्थिती स्पष्ट होईल, असंही गोपीचंद पडळकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं

Leave a Reply