राज ठाकरेंच्या आवाहनाचे लोण कर्नाटकात, आता कर्नाटकातही अजानबंदीचे प्रयत्न सुरु

मुंबई : ५ एप्रिल – कर्नाटकात गेल्या महिन्या हिजाबचा वाद सुरु झाला होता. महाराष्ट्रात भाजपच्यावतीनं अजानसाठी लावण्यात आलेले भोंगे उतरवण्यासंदर्भात भूमिका घेण्यात आली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दादर येथील शिवाजी पार्कमध्ये गुढीपाडवा मेळाव्याला संबोधित केलं. राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवेल नाही तर मशिदीसमोर हनुनान चालीसा लावू अशी भूमिका घेतली आहे. आता कर्नाटकात मशिदीवरली भोंग्यांसर्भात भाजपचे मंत्री के.एस. ईश्वराप्पा यांनी भूमिका घेतली आहे. के.एस.ईश्वराप्पा हे कर्नाटक भाजपचे प्रमुख नेते असून राज्यमंत्रिपदावर कार्यरत आहेत. मुस्लीम साजाला विश्वासात घेऊन या प्रश्नावरील मार्ग काढला जाऊ शकतो. प्रार्थनेसाठी लाऊडस्पीकर लावण्याची परंपरा फार काळ सुरु ठेवता येणार नाही. त्यामुळं विद्यार्थी, लहान मुलं आणि रुग्णांना त्रास होतो, असं ते म्हणाले आहेत.
के एस ईश्वराप्पा यांनी हनुमान चालिसा मोठ्यानं लावणं ही स्पर्धा नाही. माझा मुस्लीम समाजाच्या प्रार्थनेवर आक्षेप नाही. मात्र, मंदिर आणि चर्चमध्येही लाऊडस्पीकरवर प्रार्थना सुरु केल्यास समाजामधील संघर्ष वाढू शकतो, असं ईश्वराप्पा म्हणाले. दुसरे मंत्री सी एन अश्वनाथ यांनी आमचं सरकार अजान संदर्भात नवीन कायदा आणणार नाही. सध्या कायद्यात असलेल्या नियमाप्रमाणं आम्ही काम करणार आहोत. आम्ही कुणाच्या विरोधात नाही, असं ते म्हणाले.
बजरंग दलाचे सदस्य भारत शेट्टी यांनी मशिदीवरील भोंग्यांविरोधात मोहीम राबवली. बंगळुरुच्या अजनेय मंदिरात त्यांनी मोहीम राबवली. श्रीराम सेनेचे प्रमोद मुतालिक यांनी यांनी प्रशासनाकडे पहाटे 5 वाता लावल्या जाणाऱ्या लाऊडस्पीकरची दखल घ्यावी असं त्यांनी म्हटलंय. आम्ही प्रार्थनेच्या विरोधात नसून लाऊडस्पीकर्सला आमचा विरोध असल्याचं ते म्हणाले. जोपर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवले जात नाहीत तोपर्यंत आम्ही भजन वाजवू, असं ते म्हणाले.

Leave a Reply