चंद्रपूरमध्ये डोके छाटलेला तरुणीचा नग्नावस्थेतील मृतदेह आढळल्याने खळबळ

चंद्रपूर : ५ एप्रिल – एका तरुणीचं डोके छाटलेला मृतदेह आढळला आहे. तरुणीचा मृतदेह हा नग्नावस्थेत आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरातील या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले.
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरात एका निर्घृण हत्येने खळबळ उडाली आहे. नग्नावस्थेत असलेले डोकं छाटलेले एका युवतीचे शव मिळाले आहे. भद्रावतीच्या आयटीआयच्या मागील भागात तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यावर भद्रावती पोलीस, फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले.
या युवतीचे डोके निर्दयपणे छाटल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेनंतर पोलीस अधिक्षक स्वतः घटनास्थळी पोहचले. या संवेदनशील घटनेच्या तपासासाठी पुराव्याची शोधमोहीम सुरू झाली आहे. मयत युवती कोण? आणि कोणी तिच्यासोबत हे घृणास्पद कृत्य केले याबाबत अद्याप अनभिज्ञता आहे. आरोपीला शोधणे पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे.

Leave a Reply