महाविद्यालयाती फी भरली नाही म्हणून हिसकावला विद्यार्थ्यांचा पेपर, विद्यार्थ्याने केली आत्महत्या

अमरावती : १ एप्रिल – अमरावती जिल्ह्यातील बडनेरा परिसरातील पाळा येथील वसुधाताई देशमुख कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी महाविद्यालयात बी टेकच्या अंतिम वर्षाला अनिकेत निरगुडवार शिकत होता. मूळच्या यवतमाळ जिल्ह्यातील अनिकेत निरगुडवार या विद्यार्थ्यांने रात्री गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या मुलाने महाविद्यालयाची फी भरली नाही म्हणून महाविद्यालयाने आपल्या मुलाच्या हातातील पेपर हिसकावून घेतला. माझ्या मुलाने आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप अनिकेतचे वडील अशोक निरगुडवार यांनी केला आहे. या मुलाच्या आत्महत्ये संदर्भात त्यांनी बडनेरा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. योग्य चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणी तक्रार दाखल झाली आहे. पुढील तपास करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बाबाराव अवचार यांनी दिली.
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या प्रकरणी महाविद्यालयाने आपली बाजू मांडत विद्यार्थ्यांच्या पालकाने केलेले सर्व आरोप फेटाळले. त्याचा पेपर हिसकावला नसून त्याने पेपर दिला असल्याचं महाविद्यालयाच्या उपप्राचार्या वैशाली देशमुख यांनी सांगितलं आहे. यवतमाळ जिल्ह्यातील अनिकेत निरगूडवार असं मृत विद्यार्थ्यांचं नाव आहे. महाविद्यालय प्रशासनावर नातेवाईकांची कठोर कारवाईची मागणी केली आहे. अनिकेत बडनेरा येथील वसुधा देशमुख कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजीमध्ये शिकत होता. मृतकाचे वडील अशोक निरगुडवार यांनी बडनेरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
अनिकेत हा शेतकरी कुटुंबातील मुलगा. गेल्या तीन वर्षांपासून बडनेरा येथे शिकतो. तिथं तो भाड्याने रूम करून राहतो. कृषी अधिकारी बनायचं त्याचं स्वप्न होतं. या घटनेने वडिलांना अश्रू अनावर झाले. भविष्यातला त्यांचा आधार निघून गेलाय. काल वडिलांशी अनिकेतचं बोलणं झालं होतं. काँग्रेसचे माजी मंत्री व माजी पालकमंत्री वसुधा देशमुख यांच्या संस्थेतला हा प्रकार आहे. त्यामुळं भाजपचे कार्यकर्ते पोलीस ठाण्यात जमले होते. पोलीस सर्च ऑपरेशन करणार आहेत.

Leave a Reply