हिजाब आवश्यक आहे की नाही याचा निर्णय मौलवी देतील – माजी निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरैशी

नवी दिल्ली : २८ मार्च – माजी निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरैशी सध्या चर्चेत आले आहेत. लव जिहादच्या मुद्यावरून त्यांनी केलेल्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे. भारतात हिंदू मुली शिकलेल्या मुस्लिम मुलांसोबत विवाह करतात. त्यामुळे लव जिहादचा मोठा फटका मुस्लिम मुलींना बसत असल्याचे त्यांनी सांगितले. कुरैशी यांच्या वक्तव्यावरून आता आणखी एक नवा वाद सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लव जिहादच्या मुद्यावर दावे-प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोप सुरू असताना आता कुरैशी यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली. माजी निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरैशी यांनी सांगितले की, लव जिहाद हा एक प्रपोगंडा आहे. यामध्ये मुस्लिम मुलींचे अधिक नुकसान आहे. या मुस्लिम मुलींच्या नजरेतून पाहिल्यास म्हणता येईल की, शिकलेल्या हिंदू मुली मुस्लिम मुलांसोबत विवाह करतात. त्यामुळे मुस्लिम मुलींना लग्नासाठी योग्य मुलं सापडत नाहीत. लव जिहादमुळे मुस्लिमांना मोठा फटका बसत असल्याचे त्यांनी म्हटले.
हिजाब वादावर कुरैशी यांनी म्हटले की, हिजाब कुराणचा भाग नाही. मात्र, मुलींनी सभ्य वेशभूषा करण्याबाबत सुचवण्यात आले आहे. शाळेच्या गणवेशात शीखांना पगडी आणि सिंदूर लावण्याची परवानगी आहे. तर, हिजाबवरून काय त्रास होत आहे असा प्रश्न करत हिजाब आवश्यक आहे की नाही याचा निर्णय मौलवी देतील. कोर्ट सांगू शकत नाही, असेही त्यांनी म्हटले.
ईव्हीएमवर काय म्हणाले?
ईव्हीएम हॅकिंगचा मुद्दा कुरैशी यांनी फेटाळून लावला. ईव्हीएम विश्वासार्ह असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये छेडछाड करता आली असती तर भाजपने पश्चिम बंगाल विधानसभेची निवडणूक जिंकली असती असेही त्यांनी म्हटले.

Leave a Reply