२१ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

गोंदिया : २२ मार्च – 21 वर्षीय तरुणाने राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील मोहगाव येथे हा प्रकार उघडकीस आला. भूपेंद्र दुर्गाप्रसाद पाठक असं मयत तरुणाचं नाव आहे. त्याने आपल्या राहत्या घरी पाटणवर जाऊन गळफास घेत आयुष्याची अखेर केली. तरुणाने आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील मोहगाव येथे 21 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. भूपेंद्र दुर्गाप्रसाद पाठक याने राहत्या घरी पाटणवर जाऊन गळफास घेतल्याची माहिती आहे.
भूपेंद्रची आई आणि बहीण बाहेर गावी गेल्या होत्या. वडील हे गायी म्हशी चारण्यासाठी जंगल परिसरात गेले होते, त्यावेळी घरी कुणीच नव्हते. घरी कोणी नसल्याची संधी साधून भूपेंद्र दुर्गाप्रसाद पाठक याने गळफास घेतल्याचा आरोप आहे.
दरम्यान, भूपेंद्रच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. या घटनेची तक्रार मृतकाचे वडील दुर्गाप्रसाद यांनी आमगाव पोलीस स्टेशनला दिली. आमगाव पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. त्यानंतर तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय आमगाव येथे पाठवण्यात आला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply