महा मेट्रो शहराची दशा व दिशा बदलत आहे – डॉ अमित समर्थ

नागपुर : १६ मार्च – चेन्नई येथून साइकिल ने प्रवास करत नागपूरला पोचलेले महा मेट्रोचे सायकलिंग एम्बॅसॅडर डॉ. अमित समर्थ यांचे झीरो माइल फ्रीडम पार्क मेट्रो स्टेशन परिसर येथे सत्कार करण्यात आला. डॉ. समर्थ १३ मार्च रोजी रात्री ११ वाजता चेन्नई येथून साइकिलीने रवाना झाले आणि मंगळवार १५ मार्च रोजी सुमारे ८ वाजता फ्रीडम पार्क येथे पोचले. त्यांनी एक नवीन विक्रम या निमित्ताने प्रस्थापित केला. झिरो माईल स्टेशन येथे पोचल्यावर त्यांच्या स्वागताकरता सीआरपीएफ बैंड ने देशभक्ति धुन सादर केली.
सायकल चालवण्याच्या माध्यमाने नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणारे डॉ अमित समर्थ मेट्रोचे ब्रँड ऍम्बॅसॅडर आहेत. मेट्रोने प्रवास करण्या संबंधीचे त्यांनी अनेकदा आवाहन केले आहे. आज त्यांनी एकूण 44 तास 34 मिनटे साइकिलिंग करत 1131 किलोमीटर चे हे अंतर – चेन्नई ते नागपूर दरम्यान पूर्ण केले. डॉ. अमित समर्थ यांनी म्हटले कि प्रत्येक व्यक्तिने प्रत्येक आठवड्यात किमान दोनदा सायकल चालवली पाहिजे. नागपुर शहराणे कात टाकली असून प्रगत देशातील शहराप्रमाणे स्वरूप धारण केले आहे. आणि हे केवळ मेट्रो प्रकल्पामुळे साकार झाले आहे. त्यांनी नागरिकांना व विशेषतः विद्यार्थ्यांना मेट्रो चे मोठ्या प्रमाणात उपयोग करण्याचे आवाहन केले.
नागपुर शहराची दिशा और दशा बदलण्यात मेट्रो ची अहम भूमिका असल्याचा उल्लेख करत डॉ. समर्थ म्हणाले कि वाहतुकीचे नियम पाळले तर आम्हाला निश्चितच शहराचे स्वरूप बदलता येईल. कार्यक्रमात बोलताना महा मेट्रोचे संयुक्त महा व्यवस्थापक श्री महेश गुप्ता यांनी माहिती दिली कि प्रत्येक मेट्रो स्टेशनवर साइकलची व्यवस्था केली आहे ज्याने मेट्रो प्रवाश्यांना याचा उपयोग करता येईल. मेट्रो गाडीत प्रवाश्यांना आपल्या सोबत साइकल नेता येते. कार्यक्रमाचे प्रामुख्याने उपस्थित असलेले महानगर पालिका आययुक्त श्री राधाकृष्णन बी यांनी डॉ अमीत समर्थ यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या कडून प्रेरणा घेत सायकलचा वापर करण्याचे आवाहन केले.

Leave a Reply