सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

जाणता राजा

बारावीच्या परीक्षा सुरू झाल्यात. दोन वर्षांनी का होईना, परिक्षा केंद्रात जाऊन प्रत्यक्ष परिक्षा सुरू झाल्यात. दोन वर्षात झालेली एस टी महामंडळाच्या उलथापालथीचा झटका ह्या परिक्षार्थी विद्यार्थ्यांना बसला. कित्येक खेडोपाडी जाण्या येण्याचे साधन म्हणजे एस टी ची बस. कशी का का असेना पण गरीब नागरिकांच्या हक्काचे जाण्या येण्याचे स्वस्तातले वाहतुकीचे ते साधन होते. आणि ऐनवेळी परिक्षेच्या वेळी एस टी ने दगा दिला. मग पर्यायी व्यवस्था काय? दुसरे महागडे साधन म्हणजे “ऑटोरिक्षा” लांब पल्ल्यासाठी अतिशय हळू आणि पैशाने महागडे.
जी मंडळी खाऊन पिऊन सुखी आहेत, ज्यांच्या घरी स्वतः च्या गाड्याने ये जा आहे, त्यांना एस टी चे महत्व कळणार नाही. एक एक रुपया वाचवणारी जी मंडळी असते, ‘ह्या हातावर कमवा आणि त्या हातावर खा’ ह्या प्रकारात मोडणारी जी मंडळी असते अशा मंडळींसाठी एस टी एक हक्काचे साधन. त्यावर घरचे महिन्याचे बजेट सुद्धा एस टी वर बांधले जात असे आणि साधले जात असे. एवढेच काय पु.ल.देशपांडेंची एस टी सुद्धा लिखाणात एकेकाळी जोमानी चालली होती.
मविआ सरकार कोरोना घेऊन आले आणि कोरोना जाता जाता “एस टी” घेऊन गेले. जाणता राजाच्या राज्यात आता कुठे यायचे जायचे असेल तर आपली व्यवस्था आपण करा. सरकारी एस टी वर विसंबून राहू नका. अशा प्रकारची विसंगत तरतूद मविआ सरकारने खालच्या गटातील गरीबांची गोची करून ठेवली आहे.
आमच्या महाराष्ट्रात एक पक्ष आहे ज्याला “जाणता राजा” समजायला शंभर जन्म घ्यावे लागणार आहेत. त्या पक्षाचा हा कितवा जन्म? माहिती नाही पण “जाणता राजाच्या” आकडीत फसलेला हा पक्ष असा काही फसला आहे की “जाणता राजाचे” लांगुलचालन करण्यापलीकडे हा पक्ष, ह्या पक्षाचा मालक, ह्या पक्षाचा भुभुत्कार (तो आपला सकाळी सकाळी मिडिया माईक समोर तोंडाचा लोटा करून बोलणारा, दूरदृष्टी शुन्य, ५२ लाखाला वापस करणारा) ह्या पक्षाला जाणता राजा अजून तरी कळला नाही.
एस टी खरे तर गरीब जनांची “Life Line” आपल्या पोराकडे, लेकीकडे जाण्यासाठी किडुक मिडुक, चाराणे रुपया जमवून जमवून जाणाऱ्यांची सोय करणारी सरकारी सेवा. पण मविआ सरकारने त्याच्यावर पण बंदी आणली. आणि महाराष्ट्रातील गरीब जनांची पार विल्हेवाट लावली. जगणे असह्य करुन टाकले. काल न्युज चॅनल जेव्हा रडवेले विद्यार्थी दाखवीत होते. ऑटोरिक्षा उशीरा पोहोचला, परिक्षा केंद्रावर पोहोचून सुद्धा परिक्षार्थी, परिक्षा देवू शकले नाही. गावागावात एस टी नाही तर अशा सगळ्यांची पंचाईत. कित्येक विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात गेले. अशा प्रकारच्या बातम्या बघुन वाईट वाटले. ह्या प्रकारचे विद्यार्थी गरीबीतून बाहेर येण्यासाठी अशा प्रकारच्या परीक्षा म्हणजे एक संधी समजून, ध्येयाने प्रेरित हेतु साध्य करण्याचे साधन म्हणून आस लावून परिक्षा देत असतात. प्रत्येक परिक्षेची कदर असते, कदर करतात आणि अभ्यास नियमानुसार जास्तीत जास्त गुण मिळविण्याचा प्रयत्न करीत त्याचा फायदा आपल्या भविष्यातील उपजिविका क्षेत्र निवडण्यात उपयोजित असतात. एका एका रुपयाचा हिशेब जमवीत ही मंडळी आपल्यापरी जीवनशैली जगत असतात. आणि ऐनवेळी एस टी सारखी सरकारी यंत्रणा दगा देते आणि स्वप्नातील कार्यरत भविष्याच्या प्रयत्नांचे परखच्चे उडविले जातात. जाणता राजा! जाणताय का? तुम्ही तुमच्या राज्यातले विद्यार्थी, परिक्षा केंद्रावर पोहोचवू शकत नाही. स्वतः च्या स्वार्थापायी, लोभापायी ह्या होतकरू विद्यार्थ्यांच्या शापाचे तळपट घेऊन काय साध्य करणार? ऐकले होते जाणत्या पुत्रीच्या नावावर ही एस टी करण्याचा तुमचा मानस आहे. त्याकरिता ही सगळी एस टी महामंडळाची गोची करून ठेवली आहे आणि योग्य संधी ची तुम्ही वाट बघत आहात? खरे खोटे भगवंताला माहिती.
मात्र जे लोकं आर्थिक दृष्ट्या संपन्न आहे. जसे स्वार्थाने प्रेरीत जाणत्या राजाचा नातू चे उदाहरण घेऊ या! ह्या पोराला शालेय शिक्षणाचे काय महत्व असणार? आणि अशा नेता बनलेल्या नेतृत्वाला भविष्यात आणि सद्यस्थितीत एस टी चे महत्व असे कितीसे असणार? एकटा राहिला तरी सात पिढ्यांना पुरुन उरेल एवढी संपत्ती. गरीबांच्या वाटणीचा घशात घातलेला “लवासा” आणि धरणात मुतणाऱ्या बापाला त्या पोराच्या शिक्षणाकडे लक्ष द्यायला किती सा वेळ असणार? नातवाची कारकिर्द सुरू करण्यासाठी जाणता राजा पावसात भिजतो. जगाच्या रहाटगाडग्यात गरीब जनांच्या हिताचे तारतम्य न बाळगता खुशाल खोऱ्याने पैशाचे पोतडी भरतो. अशा जाणता राजाचे गरीबांबद्दल कळवळा असणारे, जाणते पण किती आहे? ही शंका आहे. अशा सोन्या चांदी प्लॅटिनम चा चमचा तोंडात घेऊन येणारी वंशावळ. त्यांनापण काय कळणार गरीबी चे चटके! काय कळणार गरीब जनांची एस टी ची आपुलकी! एक दिवस मत मागण्यासाठी गरीबाच्या झोपडीत जेवलो एवढे दाखविण्यासाठी जाणार फार तर “झोपडी – Destination Lunch” वाजत गाजत. बातम्यांसाठी. बाकी ज्याच्या आबालाच् गरीबीचा कळवळा नाही तर आडातच् नाही तर पोहोऱ्यात कुठुन गरीबीचा कळवळा येणार? ही मंडळी कुठुन गरीबाचे भले करणार? जाणत्या राजाची राजकीय कारकीर्द पन्नास वर्षांची असे घड्याळ सांगते पण जाणत्या राजाने जाणुन बुजुन फक्त आपल्या घराचे भले केले, एवढेच इतिहास के पन्ने!
जाणत्या राजावर लिखाण सुख एवढ्यासाठी की मिडियामध्ये बातमी झळकली की “जाणता राजाने मोदींना युद्धक्षेत्रातून विद्यार्थ्यांना आणण्यासाठी विनंती केली”? ऑ!ऑ! ज्या जाणत्या राजाला आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रावर पोहोचवू शकला नाही वेळेवर. त्या जाणत्या राजाने आंतरराष्ट्रीय स्तरावर ते सुद्धा रशियासारख्या क्षेपणास्त्रांनी धगधगत्या स्फोटामधून विद्यार्थ्यांना सही सलामत परत येण्यासाठी मोदींना विनंती????? आणि ही बातमी प्रसारमाध्यमांनी प्रसारमाध्यमांनी प्रसारित केली. हे अजून एक दुर्दैव. हे अशा प्रकारचे वक्तव्य म्हणजे मोदींच्या अथक, अविरत निस्वार्थ प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या आणि यश लाभलेल्या “ऑपरेशन गंगा” चे क्रेडिट आपल्या नावावर ओढून घेण्याची करण्यात येणारी कसरत, जाणता राजाची. स्वार्थी जीवनाच्या विश्वासघातकी जीवनाला सावरायला मग अशा प्रकारचा हास्यास्पद प्रयत्न मग जाणता राजा आणि टीम, तुकडे टाकलेल्या आपल्या प्रसार माध्यमांकडून प्रसारीत करते. आणि मोदींच्या कर्तृत्वाचे, यशाचे तुप आपल्या पोळीवर ओढायचा प्रयत्न करते. जाणता राजा लांछन तुझ्या राजकीय कारकीर्दीला की तुला अशा माकडचाळे आपले अस्तित्व टिकविण्यासाठी करावे लागते.
जाणता राजा – ज्या मोदींमुळे रशिया ५-७ तासांसाठी त्या क्षेत्रात वेळ देते आपले भारतीय नागरिक काढण्यासाठी. त्यानिमित्ताने बाकी जनतेचे देखील भले होते. अशा जीवघेण्या परिस्थितीतून जीव वाचतो, तेव्हा त्या जीवाचे लाभणारे आशिर्वाद लाखमोलाचे असतात. आमच्या भारताच्या एका ही नेत्यांमध्ये एवढी क्षमता नाही की पुतीन सारख्या नेत्याशी विनंती करुन ती प्रत्यक्षात उतरविण्याची. विचार करा, कल्पनाशक्ती चा विस्तार करा की तुमचा मित्रपक्ष उद्धव पुतीन शी बोलुन त्याला विनंती करतोय! तर कशी करेल? नाही करु शकत नं विचार! आपल्या मविआ सरकारची लायकीच् आपले घर भरण्यापुरती मर्यादित. त्याच्या पलिकडे विचारशक्ती हीन.
तुमचे राजकारणातील ५० वर्षे एकीकडे आणि मोदींचे वीस वर्षे एकीकडे. तुम्ही फक्त महाराष्ट्रातच आपले कार्यक्षेत्र ५०-५५ सीटांपर्यंत सिमीत राहिले. तुमची बुद्धी फक्त स्वतः चे घर, नातेवाईक, त्यांचे भले इथपर्यंत सिमीत. तर मोदींचे कर्तृत्व पृथ्वीतल व्याप्त, निस्वार्थ आणि जनकल्याणापासून ते जगकल्याणासाठी प्रतिबद्ध आणि त्यामार्गे प्रयत्नशील. मोदींची विचार क्षमतेची झेप म्हणजे जिथे सामान्य राजकारण्यांची झेप संपते तिथे मोदींच्या विचारांचा वेग सुरू होतो. ह्याचे सुंदर उदाहरण म्हणजे विजेची उत्पादन क्षमता मोदींनी मेगॅवॉट न सांगता जेव्हा “गिगॅवॉट” सांगितला त्यावेळेसच् कळला. ही अचाट विचारशक्ती बघून तर जगदेखील एक क्षण स्तब्ध झाले होते. आजदेखील ज्या नियोजनबद्ध पद्धतीने मोदींनी विद्यार्थ्यांची देश वापसी केली. त्यापलिकडे जाऊन त्यांनी आपल्या देशातील विद्यार्थी बाहेर का जातो? ह्या विषयावर काम करणे सुरू केले. कदाचित येत्या २-५ वर्षात भारतात विदेशी विद्यार्थी मेडिकल शिक्षण घेण्यासाठी येतील, शक्यता नाकारता येणार नाही.
त्यामुळे आपला बडेजाव आणि मोठेपणा दाखविण्यासाठी तुम्ही मोदीला नसीहत देत आहात अशा भ्रांतीत राहू नका – जाणते राजे. मोदीची विचारशक्ती ही घराचे भले करणाऱ्यातील नसून जगाचे कल्याण करण्याची क्षमता असलेली आहे. जाणता राजा – तुमची अशी नासकी विधानं प्रसारमाध्यमांमार्फत ऐकावी लागतात कारण ही सर्व प्रसारमाध्यमे तुमची बांधिल आहेत. सामान्य जनांचे खरे मत दाखविण्याची पारदर्शी पत्रकारितेचा पिंड विसरलेली ही भडवी पत्रकारिता आम्ही सहन करीत आहोत.
मोदींसाठी एकाच गोष्टीसाठी आपण कायल आहोत. मोदींची कारकीर्द वीस वर्षे आणि तुमची जाणता राजा पन्नास वर्षे. आता जाणता राजा तुमच्यावर लागलेले भ्रष्टाचाराचे आरोप, तुमची अनगिनत संपत्ती. आणि मोदी बघा – आज सुद्धा त्यांची आई दोन खोल्यांच्या घरात समाधानी जीवन जगत आहे, भ्रष्टाचार रहित, कलंक रहित मोदी आपल्या कपड्यांचा लिलाव करीत आलेला पैसा विविध योजनात दान करीत आहेत. ह्यामध्ये राजकारण सेवा – मेवा हा फरक स्पष्ट जाणवतो. जाणता राजा – मोदींना उपदेश देण्याची तुमची लायकी पण नाही. आणि भविष्यात देऊ सुद्धा नये ही १२ करोड महाराष्ट्र जनांतर्फे विनंती आहे.
त्यामुळे मोदींनी घेतलेल्या अचुक निर्णयाचे क्रेडिट आपल्या नावे करण्यासाठी फुकाचे फालतू विधान करू नका. तुमच्या लायकी प्रमाणे महाराष्ट्रातील एस टी सुरू करुन गरीब विद्यार्थ्यांना पहिले परिक्षा केंद्रावर सुखरूप पोहचविले तरी तुम्ही बरेच काही साध्य केले असे म्हणता येईल.

भाई देवघरे

Leave a Reply