डॉक्टर नालायक, लुटारू, हरामखोर, आपटून मारायच्या लायकीचे – संभाजी भिडे यांचे वादग्रस्त वक्तव्य

अमरावती : १ मार्च – शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी डॉक्टरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. संभाजी भिडेंनी करोनाची भीती डॉक्टरांनी पसरवल्याच्या आशयाचे वक्तव्य करताना डॉक्टरांवरच निशाणा साधलाय. अमरावतीमध्ये एका कार्यक्रमाममध्ये बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलंय. यावेळी त्यांनी अपशब्दही वापरलेत.
भाषणादरम्यान मास्क घालून बसलेल्या एका व्यक्तीला पाहून भिडेंनी, “तोंडावरचं काढ ते. गां* नाहीयस तू,” असं म्हटलं. त्यानंतर उपस्थित व्यक्ती हसू लागले. पुढे बोलताना संभाजी भिडेंनी, “करोना मुस्की (मास्क) बांधणं गांपणाचं लक्षण आहे, डॉक्टरांना काय सांगायचं ते सांगू देत. डॉक्टर नालायक आहेत,” असंही म्हटलं. “डॉक्टर लुटारू आहेत. डॉक्टर हरामखोर आहेत. डॉक्टर आपटून मारायच्या लायकीचे आहेत. त्यांच्याकडे कधीही जाऊ नका,” असंही संभाजी भिडेंनी करोनासंदर्भातील वक्तव्य करताना म्हटलंय. यापूर्वीही मागील वर्षी एप्रिल महिन्यात करोनाची दुसरी लाट आलेली असताना संभाजी भिडेंनी करोनामुळे मरणारी माणसं जगायच्या लायकीची नाहीत असं वक्तव्य केलं होतं. करोना हा रोग नसून, करोनाने मरणारी लोकं जगण्याच्या लायकीची नाहीत असं ते म्हणाले होते. “मुळात करोना हा रोग नाही. करोनाने माणसं मरतात ती जगण्याच्या लायकीची नाहीत. करोना हा रोग नाही. हा गां वृत्तीच्या लोकांना होणारा रोग आहे. मानसिक रोग आहे. यामुळे काही होत नाही,” असं संभाजी भिडेंनी म्हटलं होतं.
मागील वर्षी निर्बंधांवरुनही त्यांनी सरकारला फैलावर घेतलं होतं. “दारुची दुकानं उघडी…त्यांना परवानगी दिली आहे. पण कोणी काही विकत बसला आहे त्याला पोलीस काठ्या मारतात. काय चावटपणा चालला आहे. हा नालायकपणा, मूर्खपणा चालला आहे, लोकांनी बंड करुन उठलं पाहिजे. असले हे शासन फेकून दिलं पाहिजे. अजिबात उपयोगाचं नाही,” असं भिडे म्हणाले होते.
आता याच विचारांचा पुन्हा उल्लेख करत भिडेंनी डॉक्टरांना लक्ष्य केल्याने डॉक्टरांच्या संघटनांकडून याविरोधात आवाज उठवला जाण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

Leave a Reply