रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष देत केली २० लाख ५० हजारांची फसवणूक

नागपूर : १ मार्च – सेंट्रल रेल्वेमध्ये नोकरी लावून देतो, असे आमिष देत काही आरोपींनी एका व्यक्तीची तब्बल २0 लाख ५0 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत घडली.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, ११ नोव्हेंबर २0१८ ते ७ मार्च २0२0 या कालावधीत अजनी पोलिस ठाणे हद्दीत क्वॉटर्स नंबर ६/४ एलआयजी कॉलनी, नागपूर येथे राहणारे फिर्यादी उदय हरिभाऊ उमरकर (वय ३४) यांना आरोपी राजेंद्र प्रसाद तिवारी (वय अंदाजे ५७ ते ६0, रा. क्वार्टर नंबर बी ५/१, अजनी रेल्वे स्टेशनजवळ), रशीद आलम (रा. कलकत्ता) यांनी फिर्यादीस सेंट्रल रेल्वेमध्ये नोकरी लावून देण्याचे आमीष दाखविले. आरोपींच्या आमिषाला बळी पडून फिर्यादीने वेळोवेळी आरोपींना एकूण २0 लाख ५९ हजार रुपये दिले. परंतु, आरोपींनी फिर्यादीला कुठल्याही प्रकारची नोकरी लावून दिली नाही. नोकरीच्या आमिषाला बळी पाडून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी अजनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.

Leave a Reply