अ. भा. साहित्य परिषदेतर्फे गौरव “मायमराठीचा ” कार्यक्रमाचे आयोजन

नागपूर : २७ फेब्रुवारी – मराठी भाषा गौरव पंढरवाड्यानिमित्त अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या विदर्भ प्रांत शाखेच्या वतीने येत्या १ मार्च २०२२ रोजी गौरव माय मराठीचा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, धरमपेठ परिसरातील हेडगेवार रक्तपेढीच्या सभागृहात सायंकाळी७ ५ वाजता हा कार्यक्रम होईल.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ मराठी साहित्यिक आणि समीक्षक डॉ. वि. स. जोग हे उपस्थित राहणार असून अखिल भारतीय साहित्य परिषद महाराष्ट्र शाखेचे उपाध्यक्ष आणि आकाशवाणी मराठी वृत्तविभागाचे निवृत्त सहसंचालक नितीन केळकर हे देखील विशेष अतिथी म्हणून सहभागी होत आहेत.
या कार्यक्रमात कवी कुसुमाग्रजांच्या मराठी कवितांचे वाचन केले जाणार असून या कार्यकर्मात
डॉ. राजेंद्र नाईकवाडे, डॉ. अमृता इंदूरकर, डॉ, प्रसन्न शेंबेकर, शलाका जोशी, अनंत देशपांडे, हेमा नागपूरकर, स्वाती सुरंगळीकर, आणि गौरी शास्त्री देशपांडे यांचा सभाग राहणार आहे. त्याचबरोबर कुसुमाग्रजांच्या नटसम्राट नाटकातील स्वगत डॉ. सुशील वंजारी हे सादर करणार आहेत.
या कार्यक्रमात साहित्य प्रेमी रसिकांनी मोठ्या संख्येत सहभागी व्हावे असे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक अविनाश पाठक, अनिल शेंडे, डॉ. छाया नाईक प्रभृतींनी केले आहे.

Leave a Reply