जन्मदात्या आईवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला सुनावली जन्मठेपेची शिक्षा

नागपूर : २५ फेब्रुवारी – आपल्या जन्मदात्या आईवर बलात्कार करणाऱ्या मुलाला नागपूर सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणामधील आरोपी ३२ वर्षाचा असून तो व्यवसायाने मजूर आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार आरोपीचं लग्न झालेलं होतं. परंतु, त्याच्या विकृत स्वभावामुळे पत्नीला त्याच्यासोबत राहणे कठीण झाले. परिणामी तिने घटस्फोट घेतला होता. घरामध्ये हा आरोपी आपल्या आईसोबत राहत होता. या आरोपीने आपल्या आईवर बलात्कार करण्याच्या तीन वर्षापूर्वीच त्याची पत्नी त्याला सोडून गेली होती. पीडित आई धुणीभांडी करून आपला उदर्निवाह करत होती. ती आरोपीचीही काळजी घेत होती. असे असताना २१ जून २०२१ रोजी मध्यरात्री आरोपीने आपल्या आईवरच बलात्कार केला.
त्यानंतर पोलिसांनी आईच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला व त्याला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक अमित बकतवार यांनी प्रकरणाचा तपास केला. न्यायालयात सरकार पक्षाने आई व इतर साक्षीदारांचे जबाब आणि डीएनए अहवाल यावरून आरोपीवरील गुन्हा सिद्ध केला. सरकारच्या वतीने ॲड. रश्मी खापर्डे यांनी कामकाज पाहिले.

Leave a Reply