तुम्हाला राजकीय सूडबुद्धीने कारवाई वाटत असेल तर न्यायालयात जा – चंद्रकांत पाटील यांचा टोला

पुणे : २३ फेब्रुवारी – नवाब मलिक जर दोषी असतील तर कारवाई करा अशी मागणी आम्ही करणार आहोत. कारण जर डी गँगशी संबंध असतील तर देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, असा मोठा गौप्यस्फोट आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. 1993 च्या बॉम्बस्फोटातील नरसिंह राव यांचा अहवाल अजून बाकी आहे. जर तुम्हाला राजकीय सूडबुद्धीने कारवाई वाटत असेल तर न्यायालयात जा, असा टोलाही त्यांनी नाव घेता महाविकास आघाडीच्या नेत्यांना लगावला आहे. भाजपचेच नेते ईडीची कारवाई करण्यास सांगतायत असे विरोधी पक्षांनी म्हणायचं असतं. त्यांनी म्हटल्याबद्दल त्यांचं अभिनंदन व्हायला पाहिजे. अनिल देशमुख अटक झाल्यानंतर आधी हे आमच्यावर टीका केली नंतर कोण देशमुख? यांनाच माहिती नाही. विरोधकांच्या आरोपाचा आवाज हळूहळू यांचा क्षीण होत जातो. चौकशी सुरू असल्यामुळे आधिक बोलणं योग्य नाही. न्यायलयाचा दरवाजा तुम्हा ठोठावायला हवा.
न्यायलयात तुम्ही अनेक केसेस हारले आहात. टीकाही त्यांनी केली आहे. ओबीसी आरक्षाणा शिवाय महानगरपालिकांच्या निवडणुका होऊ नये. ओबीसी आरक्षणाचा निकाल लागल्यानंतरच निवडणूका घेण्यात याव्यात. वेळप्रसंगी कायद्यात बदल करावा असे मतही त्यांनी व्यक्त केल आहे. . काँग्रेसकडे टिका करण्यासाठी मुद्दे नसल्यामुळे ते इलॉजिकल टिका करतात.
महापालिकेच्या संबंधित आयुक्तांशी बैठक होती. गुंठेवारी हा एक चिंतेचा विषय आहे. त्या अडचणींमुळे घर नावावर होत नाही. देवेंद्रजींच सरकार असताना कायदा केला होता मात्र तो रेंगाळला होता. गुंठेवारीचा दंड खूप भयानक आहे. विधानसभा आणि विधानपरिषद लक्षवेधीच्या माध्यमातून लक्ष घालावं लागणार आहे. शिक्षण आयुक्तांबरोबर एक बैठक लावली आहे. इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना पवित्र पोर्टलमधून प्रवेश घ्यावा लागेल. मात्र अजूनही धारणा स्पष्ट झाली नाही. शिक्षण मंडळाला स्वायत्तता द्या पिंपरीत आहे मग इथे का नाही? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. मध्यान्ह योजना बंद होती मात्र आता 15 पासून ती सुरु होणार आहे. काँग्रेसकडे टिका करण्यासाठी मुद्दे नसल्यामुळे ते इलॉजिकल टिका करतात. जायकापुरतं एखादं टेंडर निघाल्यानंतर त्यांनी ऑब्जेक्शन केलं की रिटेंडर निघतं.

Leave a Reply