कोरोना के साथ भी… कोरोना के बाद भी…. – डाॅ. श्रीकांत राजे

नमस्कार…
कसे आहात?
आता काय बुवा मज्जा आहे. पूर्ण क्षमतेने “स्वातंत्र्य” आणि “मास्क फ्री” व्यवहार सुरु होणार तर
खरा मोकळा श्वास सुरु होवो…..

कोरोना बाबत काही विचार व्यक्त करावे. असे वाटते. कोरोना विषाणू जन्य आजार संपूर्ण शरीर आणि मन प्रभावित करतो. यापैकी एक म्हणजे फुफ्फुसाला बाधा करतो. मग आॅक्सिजन लेव्हल कमी होते (न्युमोनिया, स्कोर असे शब्द कानी पडतात.) व्हाॅट्स अप् विद्यापिठाने व्हायरल केलेल्या क्लिप्स बघण्यात आल्या त्यात जाळीत रुग्ण पकडणे, पोस्ट मार्टम न करताच गुंडाळलेल्या स्थितीत सामुहीक अंत्यविधी करणे.. ओळखीचा कुणी “पाॅसिटिव्ह” निघतो का याची भिती वाटणे….. जाऊ द्या. आता छान वातावरण निवळत आहे. परस्पर भेटी घेऊ या. संवाद वाढवू आणि कोणत्यातरी सामाजिक कामामधून मानसिक समाधानाचा आनंद मिळवू या.

या 2 वर्षाच्या कालावधीने मला वय, आजार, वागणूक, आणि जीवनसत्व, ह्या संबंधी व्यक्त व्हावसं वाटलं..

आजारपण हे सर्वकष शरीराचे असते. जिथे “प्रगट” होते त्या अवयवाचे आम्ही नामकरण करतो. पूर्वी ब्युबाॅनिक प्लेगच्या
गाठीला चटका देण्याचा उपाय करत. मग न्युमाॅनिक प्लेग फुफ्फुसाला होऊ लागला. जखमांची गाठ जांघेत /काखेत येते. मुळ आजार “जखम” आहे ती बरी झाली की गाठ आपोआप कमी होते (तिथे बेलाडोनाची छिद्राची चिकटपट्टी लावण्यात बालपण गेलं.) आता सर्वंकष चिकित्सेकडे कल असावा यासाठी…
1)आजार का झाला. याचे कारण जीवाणू विषाणू मध्ये न शोधता वातावरण,तापमान, दिनचर्या, (अतिरेकी) श्रम,
आहार, विश्रांती, मानसिक स्थिती, ह्यामध्ये शोध घेऊन सुधारणा करण्याचा प्रयत्न करावा
2) ऋतुमान, वय, आणि आवश्यकता, लक्षात घेऊन अन्नाची /आहाराची परिवाराला नियमित सवय व्हावी.
परिवाराचे एक तरी सहभोजन व्हावे.
3)आहारात समतोल आहार आणि जीवन सत्वाबाबत सर्वांनी जागरुक असावे. तसे आहारातही समावेश असावा.
4) नियमित आणि व्यवस्थित शौचाला व्हावी. नियमित स्नान स्वच्छता आणि घरचाच आहार असावा. अपवाद क्षम्य..
5)व्यवस्थित /पुरेशी, योग्य वेळी झोप व्हावी. सकाळी उठल्यानंतर फ्रेश /उत्साही करणारी
झोप व्हावी.
ही पंचसूत्री दिनचर्या असावी.

अनेकांच्या चवी दीर्घ काळ गेल्या. वास सुध्दा “हरपला”. साध्या आवाजाने अधिक चीडचीड होऊ लागली . लहान गोष्टीं संबंधी नको तितका राग येऊ लागला. नेहमीचे व्यक्ती, नातेवाईक, प्रसंग, यांचे तात्काळ विस्मरण होणे नेहमीच्या साधारण कामाचा सुध्दा ताण येणे
कामाचा उल्हास जाऊन दैनंदिन मरगळ आलेली वाटणे असे अनेक बाजूंनी कोरोनाने “डीप आणि प्रोलाॅंग इफेक्ट” केले आहेत.

ही लक्षणे नक्की दुरुस्त होणार आहेत. कालावधी बराच लागणार आहे. त्यामुळे हताश निराश अजिबात व्हायचं नाही.
मी अगोदर खुप वाचन करत असे आता वृत्तपत्राचे मथळे सुध्दा वाचायचा कंटाळा यायचा आता वृत्तपत्र वाचन बरं सुरु आहे. टीव्ही बघण्याचा कंटाळा यायचा आता गाडी रुळावर येतेय.
मला कोरोना झाला की नाही माहीत नाही 2/3दिवसाचा सर्दी खोकला एक दोन वेळा झाला असेल बाकी मी काम पूर्ण क्षमतेने करतोय..

आपलं विस्मरण, वागणं, मनाचा वैचारिक गोंधळ उडणे,
मनावर ताण येणे
निर्णय घेतांना द्विधा अवस्था होणे. परिवारातच कोण काय म्हणेल या भितीने व्यक्तच न होणे.. अशा पध्दतीची अनेक लक्षणे
कोरोना नंतर आणि
60 +वय असणाऱ्यांमध्ये आढळत आहेत ह्या मध्ये सुधारणा नक्की होणार आहेत. पण त्या साठी दीर्घ काळाच्या उद्देशाने काही कृती करु या..
1)दिनचर्या आणि कामाचा प्राधान्यक्रम निश्चित ठरविता येईल.
2)माझ्या कामाशिवाय दुसऱ्याच्या कामात मला मनःपूर्वक सहकार्य करता येईल
3)माझ्यासारखे छंद /आवड असणाऱ्या परिवार /व्यक्तीसोबत संवाद.. आनंद /वाढदिवसानिमित्त भेटणे करता येईल.
4)पुढील दीर्घ काळासाठी, रंगीत, पूर्ण पिकलेली, परेशा प्रमाणात फळांचं (कोणतीही “रेसिपी” न करता) फळांचं सेवन करणे.
5) विविध प्रकारची रंगीत पिकलेली फळं, सकाळी, शौचा – स्नाना नंतर, नियमित, व्यवस्थित भरपूर, खावीत..

खुप मोठ्या आणि भीषण काळातून आपण बाहेर पडत आहोत.
आपला परिवार आहे.
मित्र आप्तेष्ट आहेत.

दिनचर्या आहार आणि विश्रांती छान” सेट” करु.
आज आहोत ह्या पेक्षा उद्या अधिक निरोगी होऊ या..
निरामय दीर्घ आयुरारोग्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा..

डॉ. श्रीकांत राजे

Leave a Reply