वऱ्हाड्यांचा बसला भीषण अपघात, बस ३०० मीटर खोल दरीत कोसळून १४ जणांचा मृत्यू

डेहराडून : २२ फेब्रुवारी – उत्तराखंडच्या चंपावत जिल्ह्यात लग्नाच्या वऱ्हाडाने भरलेली बसला भीषण अपघात झाला आहे. बस ३०० मीटर खोल दरीत कोसळून १४ जणांचा मृत्यू झाला आहे. आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास चंपावत येथील सुखीधांग-रेठा साहिब रस्त्यावर हा भीषण अपघात झाला. बसमधील सर्वजण लग्न समारंभातून परतत होते.
या अपघातात लक्ष्मण सिंह (६१), केदार सिंह (६२), ईश्वर सिंह (४०), उमेद सिंह (४८), हयात सिंह (३७), पुष्पा देवी (५०) यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. हे सर्वजण काकनई गावचे रहिवासी होते. त्याचवेळी पुनी देवी (५५), भगवती देवी (४५) हल्दवणी येथील रहिवासी होते. बसंती देवी (३५) हे चंपावत येथील, तर श्याम लाल (५०) आणि विजय लाल (४८) हे दांडा येथील रहिवासी होते.
चंपावतपासून ६५ किमी अंतरावर हा अपघात झाला. हा अपघात सुखीधांग-रेठा साहिब रस्त्यावर झाला. एक वाहन दरीत कोसळले. या अपघातात वाहनातील १४ जणांचा मृत्यू झाला. आज पहाटे सर्वजण लग्न समारंभ आटोपून परतत असताना हा अपघात झाला, अशी माहिती कुमाऊचे डीआयजी नीलेश आनंद भरे यांनी दिली.
पंतप्रधान मोदींनी या घटनेनंतर शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विट केलं आहे. पंतप्रधान मदत निधीतून मृतांच्या वारसांना २ लाख रुपयांची मदत पंतप्रधान मोदींनी घोषित केली आहे. यासोबतच जखमींना ५० हजार रुपयांची मदत दिली जाईल, असे पंतप्रधान मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Leave a Reply