लालू प्रसाद यादव यांना चार घोटाळ्यात ५ वर्षाची शिक्षा व ६० लाखांचा दंड

रांची : २१ फेब्रुवारी – चारा घोटाळ्यात डोरंडा कोषागारातून १३९.३५ कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी दोषी ठरलेले राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) प्रमुख लालू प्रसाद यादव यांना ५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयाने ५ वर्षांच्या शिक्षेसह ६० लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. आता न्यायालयाच्या या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देणार असल्याचे लालू प्रसाद यादव यांच्या वकीलांनी सांगितले. तिथे लालूंसाठी जामीन अर्ज दाखल केला जाईल. लालूप्रसाद यादव यांनी अर्धी शिक्षा भोगली आहे, असा युक्तिवाद केला जाईल. आम्ही न्यायालयात प्रकृती अस्वास्थ्याचे कारण दिले होते, असे त्यांचे वकील म्हणाले. सध्या लालू यादव ७३ वर्षांचे आहेत.
लालू यादव यांच्यासह या प्रकरणातील ३८ दोषींनाही सोमवारी विशेष सीबीआय न्यायालयाने व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शिक्षा सुनावली. १५ फेब्रुवारीला सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. के. शशी यांनी या सर्वांना दोषी ठरवले आणि शिक्षेवरील सुनावणीसाठी २१ फेब्रुवारीची तारीख निश्चित केली होती.

Leave a Reply