गावठी दारू निर्मिती अड्ड्यावर धाड, ४२ लाखाचा मुद्देमाल जप्त, २२ जणांविरुद्ध गुन्हा

नागपूर : ३ मे – कळमेश्वर तालुक्यातील गोंडखैरी परिसरातील पारधी बरडावर अवैध गावठी दारू निर्मिती अड्डय़ावर कळमेश्वर पोलिसांनी पहाटे धाड टाकून या धाडीमध्ये २२ जणांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करीत ४२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कोरोना संक्रमण काळात दारूची दुकाने बंद असल्यामुळे कळमेश्वर पोलिस स्टेशन हद्दीतील गोंडखैरी येथील पारधी बरड येथे मोठय़ा प्रमाणात अवैध गावठी दारू तयार करून आजूबाजूचे परिसरात विक्री होत असल्याची गोपनीय खबर पोलिसांना मिळाली असता. पहाटे कळमेश्वर पोलिसांनी गोंडखैरी बरड गाठून धाड टाकली.
पोलिसांनी या धाडीमध्ये १८४0 कच्चे रसायन सडवा, ४७५ लिटर दारू जप्त करण्यात आली असून, दारूनिर्मितीसाठी लागणारे साहित्य ९८ ड्रम घमेले व इतर साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई पोलिस अधीक्षक नागपूर ग्रामीण राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक सरबंळकर व कळमेश्वर पोलिस स्टेशनचे ठाणेदार आसिफराजा शेख यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक मनोज खडसे, प्रवीण मुंडे, बुंदे, गायकवाड, सहायक फौजदार धुर्वे, पोलिस हवालदार पाली, मन्नान प्रकाश उईके, गणेश मुदमाळी, बोरकर, नीलेश उईके, स्थानिक गुन्हे शाखा नागपूर येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply