पाटीलबुवा कधीपासून भविष्य सांगायला लागले? – छगन भुजबळ यांची चंद्रकांत पाटील यांना कोपरखळी

नाशिक : १९ फेब्रुवारी – पालकमंत्री छगन भुजबळ आज येवला येथे विविध विकास कामाच्या दौरा प्रसंगी आले होते. यावेळी पत्रकारांनी भुजबळांना विचारले की पाच राज्यात निवडणुका सुरू असून भाजपला यश मिळेल असा दावा भाजप करत आहे.यावरून त्यांनी भाजप आणि चंद्रकांत पाटलाना टोला लगावला आहे. चंद्रकांत पाटील यांनी भविष्य सांगणे सुरु केले आहे. त्यांना विचार, मी त्यांना विचारले होते जोशी बुवा भविष्य पहायचे, पाटीलबुवा कधीपासून भविष्य सांगायला लागले? अशी कोपरखिळी त्यांनी चंद्रकांत पाटलांना मारली आहे. तसेच मी काय भविष्यकार आहे का? मी तर भाजीवाला आहे. मात्र विरोधी पक्षामागे केंद्रीय यंत्रणेचा वापर करणाऱ्या भाजपाला थांबवण्यासाठी लोकशाही मानणाऱ्या लोकांनी लोकशाही विचार केला पाहिजे अशी टीका भुजबळांनी केली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावावर बंगले आहेत असा दावा सोमय्यांनी केल्यानंतर ते पहाण्यासाठी किरीट सोमय्या हे करलेई गावात दाखल झाले. याबद्दल विचारले असता भुजबळ म्हणाले, त्या गावातील घरं माध्यमांमधून दाखवत आहेत. मात्र तेथे तर पडकी घरं, भिंती दिसत आहेत. तसेच भुजबळ फार्महाऊसवर पाहणी केल्या प्रकरणी किरीट सोमय्या यांना नोटीस देण्यात आलेली आहे अशीही माहिती समोर आली आहे. याबद्दल भुजबळांना विचारले असता भुजबळ म्हणाले की, सांताक्रूझ येथील बंगला असून या ठिकाणी किरीट सोमय्या काही लोकांना घेऊन गेले होते. मात्र पोलिसांनी गर्दीमुळे त्यांची तब्येत बिघडू नये. याकरता पोलिसांनी नोटीस बजावली होती.
भाजपचे नेते किरीट सोमय्या आपल्या लवाजम्यासह आज कोर्लईत पोहोचले. यावेळी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते. बाईकवर बसून शेकडो कार्यकर्ते सोमय्यांसोबत आले होते.सोमय्या यांच्यासोबत भाजपचे कार्यकर्ते असल्याने शिवसैनिकांनीही कोर्लईच्या ग्रामपंचायतीसमोर तुफान गर्दी केली. यात महिला रणरागिणीचा सर्वाधिक समावेश होता. शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आल्याने कोर्लईत प्रचंड तणाव निर्माण झाला होता. सोमय्या येताच शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. यावेळी सोमय्या यांचा ताफाही अडवण्याचा प्रयत्न झाला. तसेच सोमय्या हे ग्रामपंचायतीच्या कार्यालयात जाताच शिवसैनिकांनीही ग्रामपंचायत कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, सोमय्यांसोबत असलेल्या सुरक्षा रक्षकांनी शिवसैनिकांना हुसकावून लावले.

Leave a Reply