सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

कोरोना चा कायदा – सरकार चा फायदा

सद्यपरिस्थितीत परदेशात जाण्याचा योग आला, कोरोना काळात प्रवास योग ते सुद्धा आफ्रिकेत म्हटल्यावर धाबे दणाणले. आत्ताच साऊथ आफ्रिकेतून नवीन कोरोना पुत्र अवतरलेले आता तर दोन वर्षे झालीत. कोरोनाच्या नावाने सतत लॉकडाऊन मुळे लिखाणाकडे वळलो, एक पुस्तक प्रकाशित झाले आणि अचानक एका कंपनीने ताबडतोब या म्हटल्यावर पुर्व स्नेह संबंधांमुळे नाकारू शकलो नाही. प्रवासाला मान्यता दिली. लगेच व्हिसा तिकिटे आली आणि त्यासोबत प्रवासाच्या अटीपण आल्या आणि प्रवासाला निघण्याअगोदर RTPCR चाचणी आवश्यक बाबी मध्ये आली आणि प्रवासपुर्व RTPCR चाचणी साठी आमचे सॅंपल घेतले गेले. सॅंपल घेणाऱ्याला आवर्जून सांगितले की रे बाबा! प्रवासाला जायचे आहे म्हणून ही चाचणी. सॅंपल घेतले, घेणाऱ्याने सांगितले की काळजी करू नका. निगेटिव्ह येणार – हे कानात, हळु आवाजात सांगितले. ऑफिशियली त्याने सांगितले की चाचणी परिक्षण पद्धतीमध्ये हस्तक्षेप करणार नाही. चाचणी चे पारदर्शी रिझल्ट्स मात्र उद्या मिळतील.
माणसाचे मन किती चंचल असते ह्याचे उदाहरण म्हणजे RTPCR चाचणी. सॅंपल घेणाऱ्याने कानमंत्र दिला. चाचणी निगेटिव्ह येणार. पण मन आपले अत्यवस्थ – नाही आली निगेटिव्ह तर!!!!! मन चिंती जे वैरी न चिंती. मग फुकटच्या इकडल्या तिकडल्या लोकांशी खालिपिली गप्पा!!! अरे यार, RTPCR दिला आहे. रिपोर्ट ची वाट बघतोय. मानवीय मनाची संरचना किती क्लिष्ट आहे ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे. RTPCR ची चाचणी. आता आपण स्वतः आपल्या मनाची समजूत काढण्याकरिता कोणाला फोन करतो की बाबा, चाचणी रिपोर्ट ची वाट बघतोय, निगेटिव्ह येणार असा कानमंत्र आहे. पण अजून यायचा आहे, मन अस्वस्थ होते म्हणून सहज तुम्हाला एक सहज फोन केला. तर समोरचा फोन करण्याचा रागरंग ओळखून अरे रिपोर्ट निगेटिव्ह येणार काळजी करू नकोस. असं काहीसे बोलेल, असा आपला अंदाज नेमका चुकतो आणि समोरचा अनावधानाने नको तिथे आपले वाईट अनुभव उलगडुन, आता तुझे काही खरं नाही, असे सांगून तुमचा जाण्याच्या मार्गात एक मांजर आडवी टाकुन मोकळा होतो. अहो! तुम्हाला माहिती आहे का? मी पण कान टवकारले! मी म्हटले काय? अहो, सरकारला जेव्हा कोरोनाची लाट आणायची असते ना! त्याने एक मोठ्ठा पॉज घेतला. सस्पेन्स अजुन वाढवला. माझ्याकडून फोनवर काही हुश्श हाश्श ची प्रतिक्रिया येते की काय, ह्याचा अंदाज घेतला आणि सस्पेन्स अजुन वाढवून पुढे बोलणे सुरू केले. की मी स्वतः ह्या सर्व चाली ओळखतो. सरकारला जेव्हा कोरोनाची लाट आणायची असते त्यावेळी ते चाईनाच्या किट सर्वत्र वाटप करतात आणि जेव्हा कोरोनाची लाट आणायची नसते तेव्हा भारतीय किट सगळीकडे वाटप करतात. चीनच्या किट मध्ये कुठलेही सॅंपल टाका, टेस्ट रिपोर्ट पॉसिटिव्ह येणार. आणि आता सरकार तर! हो ते आपले महाराष्ट्र सरकार ! कोरोना लाटेवर आरूढ आहे तर तुझा रिपोर्ट पॉसिटिव्ह येणार मग आमच्या एका वर्गमैत्रिणीने सांगितल्यानुसार नागपूर महानगरपालिका तुम्हाला हॉस्पिटलमध्ये टाकणार आणि भरपूर पैसे भरल्यानंतर लाख दोन लाख भरल्यानंतर – गरम पाण्याच्या गुळण्या – पाच दहा पॅरासिटॅमॉल च्या गोळ्या, नको असणाऱ्या रोज चाचण्या घेणार आणि बिलाची लांबी वाढवणार मग एक कन्सल्टंट डॉक्टर रोज येवून तुमच्यासमोर सिरीयस चेहरा घेवून तुम्हाला कोरोनाचे महत्व पटवून देणार त्या भिती दाखविण्याचे चार्जेस व्हिजीट फी चे नावावर पंधराशे रुपये रोजचे वेगळे आकारणार आणि शेवटी उपकार केल्यागत मोठ्ठी रक्कम उकळून तुमची हॉस्पिटल नामक कैदैतून सुटका करणार. अर्थात ज्याला फोन केला त्याने खरे सांगितले खोटे सांगितले माहिती नाही पण मनाला वाटले की आपण ह्याला कशालाच फोन केला – आ बैल मुझे मार – सांगितले! आपण सांत्वना होईल की काळजी करू नको बरे होईल असा आपल्याला दिलासा मिळेल तर समोरच्याने तर टेन्शन दिले. वर हे पण सांगितले की अरे हे तर सॅंपल कलेक्ट करणारे, ह्यांच्या हातात काय असते? आमच्या लहानपणी कुत्रे पकडण्यासाठी एक नगरपालिकेची गाडी यायची. आणि रस्त्यावर फिरणारे कुत्रे घेऊन जायची. घरी अशी नगरपालिकेची माणसं आली की हमखास कुत्रे पकडणारी नगरपालिकेची गाडी आठवते. आता ती गाडी कोरोनाग्रस्त माणसांना इस्पितळात ढकलते.
परत कोरोना टेस्ट म्हटल्यावर आईची आठवण तर हमखास होणार. आईला विवेका हॉस्पिटल मध्ये तिचे युरिया, क्रिएटिनीन वाढलै म्हणून दाखल केले. नियमानुसार तिची कोविड टेस्ट केली. दुर्दैवाने ती कोविड टेस्ट पॉझिटिव्ह निघाली आणि आईची रवानगी पाचव्या मजल्यावर करण्यात आली. बरे! त्यांचे जे ऑनलाईन पोर्टल आहे त्यात आईचे जे रोजचे टेस्ट रिपोर्ट यायचे पण आई ला आईला ज्या कारणाने ऍडमिट केले तो कोविड पॉसिटिव्ह रिपोर्ट मात्र आजपर्यंत बाहेर आला नाही. निदान करणारा आपल्या खामलातला ऍलोपॅथीचा वैद्य जो पहिले आपल्या स्वतः च्या दवाखान्यात दाखल करतो. चार पाच दिवस झालेत की रुग्णाला अत्यवस्थ करतो आणि मग इलाजासाठी त्याला ऑरेंज सिटी रुग्णालयात दाखल करतो आणि त्याच रुग्णांकडून कंसल्टेशन चे रुपात फी उकळतो आणि नवीन रुग्ण दिल्याने त्याची नोंद होत असते आणि एक प्रकारे दिलेले मासिक आर्थिक टारगेट पुर्ण होते. जीव मात्र रूग्णाचा टांगणीला लागतो आणि घरच्यांचा जीव आर्थिक दृष्ट्या टांगणीला लागतो. आणि हा ऍलोपथीचा वैद्य खामला रोडचा टांगणीच्या टाळुवरचं लोणी खात, पापाच्या पैशाने आपले घर भरत असतो आणि ईस्पितळाचे पोट फुगवत असतो.
कोरोना काळाने डॉक्टरी पेशाचे खरे रुप नागडे झाले. साध्या साध्या रोगाने ग्रस्त लोकंसुद्धा कोरोनाच्या चाचणी प्रकरणाने घरच्या घरी इलाज करतात जे की तर्कसंगत नाही आणि शास्त्रसंमत तर नाहीच नाही. पण कोण पंगा घ्या कोरोनाशी म्हणून गप्प घरात बसतात. आणि कोणी अडका – कोरोनाच्या कायद्यात!
बरं आमच्या ओळखीच्या एका मित्राने तर असे सांगितले की कोरोना लाटेत माणसे मेली तर कोरोनाची भिती जनमानसात रुजविली जाणार म्हणजे माणसे मरणे गरजेचे त्यातल्या त्यात तरुण गैर मुस्लिमांना पायाच्या अंगठ्याला एक इंजेक्शन दिले असे लोकं एक दोन दिवसात देवाघरी गेले. आणि मरणाऱ्यांचा आकडा फुगवून सांगण्यास व दहशतीला पसरविण्यात मदत झाली. आता ह्याने खरे सांगितले, खोटे सांगितले देव जाणे.
इतके सगळे कपोलकल्पित दाखल्यामध्ये मी RTPCR ची चाचणीची वाट पाहतोय आणि लोकं एक एक किस्सा वाढवत माझ्या मनोबलाची परिक्षा बघताहेत. मी आपला का होते रे बाप्पा म्हणत बाप्पाला साकडं घालतोय. देवा कोरोनाची चाचणी “निगेटिव्ह” येवू दे रे बाप्पा!
कोरोना माता पावली आणि रिपोर्ट निगेटिव्ह आला. आता आफ्रिकेपर्यंतचा प्रवास विमानाने करायला रान मोकळे. पण एका झटक्यात जनतेचे रान मोकळे करील ते सरकार कसले? आजकाल हलाल सरकार. झटका वाल्यांचे झाले दिवस लंपास. मी पुन्हा येईन म्हणणारा पण आता दिसत नाही आसपास.
विमानतळ गाठला. व्हिसा, यलो फिव्हर कार्ड, ४८ तासाचे आतला कोरोना चाचणी निगेटिव्ह चा रिपोर्ट , लागणारे सर्व कागदपत्रे अद्ययावत. आत शिरताक्षणीच जाणवते की दोन दोन मीटर दुरीवर आज ही प्रवाशांची बसायची सोय आहे. शारजाला जाणारी एयर अरेबियाचे विमान. त्यात सर्वात जास्त मुछ नदारद दाढीधारी आणि काळ्या बुरख्याआड बेगमा सवतीधारी, तर कित्येक जणींचे पाव भारी. पता नही तबलिगी जमात धारी भी होंगे का नाही! पण शारजाहला जायचे असेल तर विमानतळ प्रवेशावर कोरोना निगेटिव्ह चाचणी रिपोर्ट, मग परत विमानतळावर २००० रुपये भरून परत एक कोरोना चाचणी चे निगेटिव्ह रिपोर्ट अत्यावश्यक – परत सॅंपल घेणारा कानमंत्र देणार डरो नही – ये सब सरकारकी नौटंकी है पैसा कमानेकी! आता विचार करा, १८८ विमानप्रवासी गुणिले २००० रुपये. = ३,७६,००० एका आंतरराष्ट्रीय विमानाचे म्हणजे महिन्याचे १करोड १२ लाख ८० हजार. साहेब विमान तिकीटाचे पैसे तुमचे, सरकार कोरोनाची भिती दाखवणार तुम्हाला, पहिली विमानतळावर प्रवेशासाठी तुम्हाला कोरोना निगेटिव्ह अत्यावश्यक त्याचे पैसै ७०० ते १२०० रुपये प्रति प्रवाशी तुमच्याच खिशातून. आणि आमचे शहाणे सरकार तुम्हाला रांगेत उभे करताना २ मीटरची फुटपट्टी लावणार आणि विमानात अगलबगल प्रत्येक सीटवर बसवणार.
शारजाहला विमान बदलण्यासाठी उतरलो. तुम्हाला पुढचे विमान गाठायचे तर “कनेक्शन” नावाची एक वेगळी लेन आहे. त्या लेनवरून तुम्ही आपल्या पुढल्या विमानासाठी जाऊ शकता. भव्य हॉलच्या भिंतीलगत एक मीटर रुंद, प्रवाशांना जाण्यासाठी “कनेक्शन” लेन – पायवाट. हॉलमध्ये सहज नजर फिरवली तर संपूर्ण हॉल “तात्काळ कोरोना चाचणीच्या असंख्य अद्ययावत यंत्रांनी भरलेला” आणि जे विमानात चढायच्या अगोदर दोनदा कोरोना निगेटिव्ह होते, त्यांची परत उतरल्यावर कोरोना चाचणी सुरू होती. म्हणजे विमानतळापर्यंत सर्व मंडळी दोन दोन मीटर फुटपट्टी वर – विमानात अगलबगल बसलेले – तर विमानात जवळजवळ बसविल्याने तर कोरोना झाला नाही ना! असे म्हणायचे आहे का? असे असेल तर तो सर्व पैसा विमान कंपन्यांनी द्यायला नको का? पण इथे तर पैसे भी तेरे – कोरोना भी तेरा!
माझ्या मते कोरोना एक पुर्णतः नौटंकी आहे. शाळा, अर्थशास्त्र, जनतेची आर्थिक घडी विस्कटायचं शस्त्र आहे. जगाला मागे ढकलुन संकटात पाडायचं शास्त्र आहे. केंद्र सरकारकडून – राज्य सरकारने पैसा उकळायचे शास्त्र आहे. गरीबांच्या आतड्यांशी खेळायचं शास्त्र आहे आणि राजकारण्यांचे स्वतः चे खिशाभरू शास्त्र आहे. असे आताच्या तिसऱ्या लाटेत वाटायला लागले आहे. पहिल्या दोन लाटा खऱ्या असतीलही पण तिसरी लाट जाणूनबुजून आणल्यासारखी वाटते.
आम्ही पुढले विमान गाठण्यासाठी हा हॉल पार करत असताना आमच्या विमानातील काही मंडळी त्या यंत्रासमोर खुर्चीवर स्थानापन्न झालेले आणि नाक समोर करून स्वॅप नाकात टाकण्यासाठी मान वर करून आकाशाकडे बघणारे आणि नाकात आतपर्यंत स्वॅप टाकल्यामुळे अंगात सुळसुळी आल्यावर शहारल्या अंगांनी, मान खाली करताना बघितलेले.
आम्ही पण आफ्रिकेसाठी कोरोना चाचणीसाठीचे पुर्व निवेदन दिलेले. पुढचे आफ्रिकेचे विमान पकडले विमानतळावर उतरलो. तर पहिलाच तंबु कोरोना चाचणीसाठी सुसज्ज. ताबडतोब फॉर्म बघितल्यागेला ३० अमेरिकन डॉलर दिले गेले. मान वर करुन आमच्या नाकाच्या आतल्या टोकापर्यंत अंगाला सुळसुळी येतपर्यंत स्वॅप घुसवल्या गेला. We will inform you on your mobile” असे सांगितले गेले आणि अशाप्रकारे विमानाच्या प्रवासाव्यतिरिक्त देश विदेशातील सरकारांना एकुण साडे पाच ते सहा हजार दिल्या गेले, जे प्रवासी निघण्याच्या आधी कोरोना निगेटिव्ह आहेत त्यांच्या अजून कोरोना परिक्षणाची, तत्काळ परिक्षणाची गरज काय? जेव्हा WHO आमची सरकारे सांगतात की लागण झाल्यावर कोरोनाची बाधा असल्याचे परिणाम ५-७ दिवसात दिसणे सुरु होतात. मग तत्काळ चाचण्या काय पैसे उकळण्यासाठी काय? एकंदर काय, “कोरोना का कायदा – सरकार का फायदा” !

भाई देवघरे

Leave a Reply